महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जगातील सर्वात शांततापूर्ण युद्ध

06:58 AM Jan 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एकाचाही गेला नव्हता बळी, 30 वर्षांपर्यंत चालले युद्ध

Advertisement

युद्धाचा उल्लेख होताच चहुबाजूला मृतदेहांचा खच, बॉम्बवर्षाव, गोळीबार करणाऱ्या सैनिकांचे चित्र मनात उभे ठाकते. रशिया-युक्रेन, इस्रायल-हमास युद्ध सर्वांसमोर आहे, यात हजारो लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे, परंतु जगात एक युद्ध असे देखील झाले होते, जे शांततापूर्ण होते, ज्यात एकाचाही मृत्यू झाला नव्हता. हे युद्ध 30 वर्षांपर्यंत चालले आणि एकाही नागरिकाचा मृत्यू झाला नव्हता. एवढेच नव्हे तर या युद्धात गोळ्याही झाडल्या गेल्या नव्हत्या. हे युद्ध साधेसुधे नव्हे तर दोन देशांदरम्यान झाले होते.

Advertisement

डेन्मार्क आणि कॅनडा यांच्यात हे युद्ध झाले होते. 1970 पासून हे युद्ध सुरू होते आणि मागील वर्षी यात एक तडजोड झाली होती. दोन्ही देश एका निर्जर बेटासाठी परस्परांसोबत लढत होते. याचे नाव हंस आयलँड असून आर्क्टिक खाडीत एक चौरस किलोमीटरपेक्षा अधिक आकाराचे हे बेट निर्जन आहे. हवामान स्थानकाशिवाय येथे काहीच नाही. तसेच येथे कुठलीच नैसर्गिक संपदा नाही. परंतु 30 वर्षांपासून कॅनडा आणि डेन्मार्क या बेटावर दावा करत होते. यामुळे दोन्ही देश आळीपाळीने स्वत:चे सैन्य या छोट्या बेटावर पाठवत होते, वारंवार स्वत:चा ध्वज फडकवत होते आणि दुसऱ्या देशाचा ध्वज हटवून फेकत होते.

1984 मध्ये शिगेला पोहोचला होता तणाव

दोन्ही देशांदरम्यान अनेकदा तणाव अत्यंत अधिक असायचा. 1933 मध्ये लीग ऑफ नेशन्सने डेन्मार्कच्या बाजूने निर्णय दिला होता. परंतु लीग ऑफ नेशन्सचे अस्तित्व संपुष्टात आल्यावर कॅनडाने हा निर्णय मानण्यास नकार दिला होता. 1984 मध्ये हा मुद्दा कॅनडाच्या सैन्याने बेटावर एक ध्वज फडकविला होता आणि वेलकम टू कॅनडा लिहून व्हिस्कीची  एक बॉटल सोडली होती. याच्या एक आठवड्यानंतर डेन्मार्कचा मंत्री हा ध्वज हटविण्यासाठी हंस बेटावर पोहोचला होता. मद्याची एक बाटली आणि एक पत्र सोडले होते, ज्यात डेन्मार्कमध्ये तुमचे स्वागत आहे असे नमूद होते.

मागील वर्षी युद्ध संपुष्टात

डेन्मार्कच्या मंत्र्यानंतर सैनिक देखील तेथे पोहोचले होते. तेव्हापासून दोन्ही देशांचे सैन्य हेच काम करत होते. याचमुळे याला ‘व्हिस्की युद्ध’ देखील म्हटले गेले होते. हा प्रकार मजेशीर वाटत असला तरीही यामागे गंभीर तणाव होता. परंतु मागील वर्षी हे शांततापूर्ण युद्ध संपुष्टात आले होते. मागील वर्षी कॅनडा आणि डेन्मार्कदरम्यान एक करार झाला होता. दोन्ही देशांनी बेटाचा अर्धा-अर्धा हिस्सा विभागून गेला होता. डेन्मार्कच्या किनाऱ्यानजीकचा भाग डेन्मार्कला मिळाला तर कॅनडाच्या दिशेकडील हिस्सा कॅनडाला प्राप्त झाला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article