For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्वात शांतताप्रिय प्राणी

06:49 AM Aug 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
सर्वात शांतताप्रिय प्राणी
Advertisement

केवळ त्याच्याकडे पाहण्याची अनुमती, गोंगाट ऐकताच करतो आत्महत्या

Advertisement

निसर्गाने काही प्राण्यांना इतके संवेदनशील केले आहे, छोटीशी चूक देखील त्यांच्यासाठी घातक ठरू शकते. यात सर्वात प्रमुख फिलिपाईन्स टार्सियर आहे. हा छोट्यातील छोटा प्रायमेट इतका नाजुक आहे की तीव्र आवाज, कॅमेऱ्याची फ्लॅश लाइट किंवा वारंवार स्पर्श केल्यास तो गंभीर तणावात जातो. अनेकदा हा तणाव इतका वाढतो की तो अन्नच त्यागतो किंवा स्वत:ला ईजा करून घेत स्वत:चा जीव गमावून बसतो. टार्सियरचे डोळे डोक्याच्या तुलनेत अत्यंत मोठे असतात, हा रात्री सक्रीय होणारा प्राणी आहे आणि स्वत:च्या मोठमोठ्या डोळ्यांनी शिकार सहजपणे टिपू शकतो. याचे वजन केवळ 100-150 ग्रॅम असते. हा प्राणी झाडांवर राहतो आणि अत्यंत कमी अंतरापर्यंत उडी घेऊ शकतो.

का असतो इतका संवेदनशील

Advertisement

वैज्ञानिकांनुसार टार्सियरचे तंत्रिका तंत्र (नर्वस सिस्टीम) अत्यंत नाजुक आहे. कैदेत किंवा पर्यटकांमुळे सातत्याने अडथळे त्यांच्यासाठी घातक ठरतात. काही प्राणी तर वारंवार भिंतीवर आदळून घेत जखमी होतात. परंतु वैज्ञानिक याला आत्महत्या मानत नाहीत, तर तणाव त्यांच्या मृत्यूचे मोठे कारण अवश्य आहे.

संरक्षण केंद्रांचे कठोर नियम

टार्सियर संरक्षण केंद्र आणि वाइल्डलाइफ सँक्च्युरीमध्ये येणाऱ्या पर्यटकांना कठोर ताकीद दिली जाते की त्यांनी पूर्णपणे गप्प रहावे. छायाचित्रे काढत असल्यास फ्लॅश लाइटचा अजिबात वापर न करण्याची सूचना असते. येथे प्राण्यांना स्पर्श करणे किंवा त्यांना त्रास देण्यास मनाई आहे. लोकांना हळूहळू आणि अंतर राखून चालण्याची ताकीद दिली जाते. हे सर्व नियम प्राण्यांच्या सुरक्षेसाठी निर्माण करण्यात आले आहेत.

सोशल मीडियावर चर्चा

या प्राण्याची छायाचित्रे अन् व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर लोक त्याच्या क्यूटनेसच्या प्रेमात पडतात. परंतु या प्राण्यांचा पाण्याची सर्वात योग्य पद्धत ‘ऑब्झर्व फ्रॉम डिस्टन्स अँड स्टे सायलेंट’ असल्याचे तज्ञ सांगतात. शहरीकरण, जंगलतोड आणि पर्यटन हालचालींमुळे टार्सियरची संख्या वेगाने घटत आहे. फिलिपाईन्स सरकार आणि अनेक स्वयंसेवी संस्था त्यांच्या सुरक्षेसाठी काम करत आहेत.

Advertisement
Tags :

.