सर्वात रहस्यमय स्मारक
07:00 AM Oct 17, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
हे रहस्यमय स्मारक एका मोठ्या वर्तुळाकार ढिगाऱ्याप्रमाणे असून यात एक अंतर्गत दगडाचा मार्ग आणि कक्ष आहे. या कक्षांमध्ये मानवी हाडांसोबत थडग्यांची सामग्री मिळाली आहे. उत्खननात येथे जळालेली आणि अर्धवट जळालेल्या मानवी अस्थी मिळाल्या आहेत. स्मारकाच्या आत मानवी मृतदेह ठेवण्यात आले होते, ज्यातील काहींवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते असे यातून स्पष्ट होते. या स्मारकाचे कुठल्या न कुठल्या प्रकारे धार्मिक महत्त्व होते, येथे बहुधा एखाद्या प्रकारची पूजा होत असावी असे अनेक पुरातत्व तज्ञांचे मानणे आहे, परंतु या ठिकाणा कोणत्या कामासाठी वापर केला जायचा आणि याची निर्मिती कुणी केली हे अद्याप उघड होऊ शकलेले नाही. म्हणजेच हे आतापर्यंत एक रहस्यच ठरले आहे. या ठिकाणाचा शोध खूप आधी झाला होता, ज्यानंतर 1962 ते 1 75 पर्यंत उत्खननाचे काम झाले आणि याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या स्मारकाच्या एका कक्षात 19 मीटरचा मार्ग असून तो केवळ हिवाळ्यातच सूर्योदयाच्या वेळी प्रकाशमान असतो, हे देखील एक रहस्यच आहे.
Advertisement
जगात अनेक रहस्यमय गोष्टी आणि जागा आहेत. हजारो वर्षांपासून त्यांचे रहस्य कायम आहे. असेच एक ठिकाण आयर्लंडच्या काउंटी मथ येथे अहे. येथे एका प्रागैतिहासिक स्मारक असून ते बॉयरन नदीच्या उत्तरेस ड्रोघेडाहून 8 किलोमीटर अंतरावर आहे. या स्मारकाचे नाव न्यूग्रेंज आहे. येथे ख्रिस्तपूर्व 3200 वर्षांच्या आसपास नवपाषाण काळादरम्यान निर्माण करण्यात आलेले एक असाधारण भव्य स्मारक असून ते जगप्रसिद्ध स्टोनहेंज आणि इजिप्तच्या पिरॅमिडपेक्षाही जुने आहे. हे स्मारक स्टोनहेंजपेक्षा सुमारे 500 वर्षे जुने असल्याचे मानले जाते.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article