For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्वात महाग व्हिस्कीची बॉटल

06:26 AM Feb 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
सर्वात महाग व्हिस्कीची बॉटल
Advertisement

याच्या किमतीत खरेदी करता येईल आलिशान बंगला

Advertisement

द एमराल्ड आइल नावाच्या व्हिस्कीची एक बॉटल अत्यंत महाग मानली जाते. याच्या किमतीत एक आलिशान बंगला खरेदी करता येतो. याचमुळे आता ही जगातील सर्वात महागडी व्हिस्कीची बॉटल ठरली आहे. या बॉटलची निर्मिती ‘द क्राफ्ट आयरिश व्हिस्की कंपनी’ने केली होती. 30 वर्षे जुनी ही व्हिस्कीची बॉटल महाग असण्यामागे अनेक कारणे आहेत.

द एमराल्ड आइल व्हिस्कीच्या बॉटलची विक्री 2.2 दशलक्ष युरोंमध्ये झाली आहे. भारतीय चलनात हे मूल्य 23 कोटी 29 लाख 1 हजार 858 ऊपये इतकी आहे. या अद्भूत व्हिस्कीची खरेदी करणे सर्वांनाच शक्य होईल असे नाही.

Advertisement

व्हिस्कीची ही बॉटल अमेरिकन संग्राहक माइक डेलीने ‘द क्राफ्ट आयरिश व्हिस्की कंपनीकडून खरेदी केली आहे. त्यांना या बॉटलसोबत अनेक महागड्या गोष्टीही मिळाल्या आहेत. यात सेल्टिग एग, एक आकर्षक घड्याळ आणि कोहिबा सिगारची एक जोडी सामील आहे. या सर्व गोष्टी सोने, हिरे आणि रत्नांद्वारे तयार करण्यात आल्या आहेत.

द एमराल्ड आइल व्हिस्कीची ही बाटली इतरांपेक्षा अत्यंत वेगळी आहे. ही बॉटल जवळपास 30 वर्षे जुनी असल्याचे सांगण्यात येते. एमराल्ड आइल एक दुर्लभ, ट्रिपल-डिस्टिल्ड, सिंगल माल्ट आयरिश व्हिस्की आहे. बॉटलला  इटालियन चित्रकार वेलेरियो अदामीकडून डिझाइन करण्यात आलेल्या लेबलसोबत कव्हर करण्यात आली होती. यामुळे याच्या किमतीत मोठी भर पडली असल्याचे क्राफ्ट आयरिश व्हिस्की कंपनीने म्हटले आहे.

एमराल्ड आइल व्हिस्की हस्तनिर्मित असून याच्या प्रत्येक बॉटलसोबत एक पॅबरेग सेल्टिक एग देखील असून त्याची निर्मिती चौथ्या पिढीच्या पॅबरेग वर्कमास्टर डॉ. मार्कस मोहर यांनी स्वत:च्या हातांनी केली होती. हा एक 18के सोन्याने तयार करण्यात आलेला आहे. याच्या निर्मितीकरता 100 तासांहून अधिक वेळ लागला असून यात 104 आकर्षक कट असलेले हिरे जडविण्यात आले आहेत. तसेच यासोबत मिळणारे घड्याळ सोने आणि रत्नांनी जडविण्यात आलेले आहे.

Advertisement
Tags :

.