टीव्हीवरील सर्वात महागडी अभिनेत्री
वयाच्या 61 व्या वर्षी टॉम क्रूजलाही टाकले मागे
टीव्ही एंटरटेन्मेंटचा सर्वात मोठा स्रोत आहे यात कुठलाच संशय नाही. टीव्ही शोमध्ये काम करणारे कलाकार प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असतात. तरीही फिल्मी कलाकारांच्या तुलनेत टीव्ही कलाकारांना कमी मानधन दिले जाते. परंतु आता काळ बदलत आहे. आता टीव्ही स्टार्स आघाडीच्या चित्रपट कलाकारांच्या तुलनेत अधिक मानधन आकारत आहेत. जगातील सर्वात महागड्या अभिनेत्री आता ए -लिस्टर स्टार टॉम क्रूजलाही कमाईप्रकरणी मागे टाकले आहे.
सर्वात धनाढ्या अभिनेता ड्वेन जॉन्सन असून त्याची वर्षभराची कमाई 88 दशलक्ष डॉलर्स आहे, तर सर्वात श्रीमंत अभिनेत्री निकोल किडमॅन असून ती 57 वर्षांची आहे, तर तिचे वार्षिक उत्पन्न 31 दशलक्ष डॉलर्स आहे. तर टीव्ही सेलेबमध्ये 61 वर्षीय अभिनेत्री मारिस्का हार्गिटे सर्वात अधिक मानधन आकारते. मारिस्काने मागील वर्षी 25 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आहे. 2024 च्या सर्वात महागड्या कलाकारांमध्ये ती 11 व्या स्थानावर राहिली.
मारिस्काने कमाईप्रकरणी दिग्गजांना टाकले मागे
टॉम क्रूज 18 दशलक्ष डॉलर्स
जॉन सीना 23 दशलक्ष डॉलर्स
स्कार्लेट जॉन्सन 21 दशलक्ष डॉलर्स
मॅट डेमन 23 दशलक्ष डॉलर्स
जेसन स्टॅथम 24 दशलक्ष डॉलर्स
जेक गिलेनहाल 22 दशलक्ष डॉलर्स
मारिस्का हार्गिटेची कारकीर्द
मारिस्का ही अमेरिकन टीव्हीवरील सर्वाधिक काळ चालणारा प्राइमटाइम ड्रामा ‘लॉ अँड ऑर्डर : स्पेशल व्हिक्टिम युनिट’मध्ये ‘ओलिविया बेन्सन’च्या भूमिकेसाठी ओळखली जाते. मारिस्काने स्वत:च्या कारकीर्दीची सुरुवात 1980 च्या दशकात केली होती. तिने अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले होते. परंतु तिला सर्वाधिक यश लॉ अँड ऑर्डर : स्पेशल व्हिक्टीम युनिटमध्ये मिळाले. या शोमध्ये तिने 26 वर्षांपर्यंत काम केले आहे.