येथे येतात सर्वात धोकादायक वादळ
एका झटक्यात उलटतात वाहनं
एक वादळ काय घडवून आणू शकते याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? जगात दरवर्षी अशी अनेक वादळं येत असतात, ज्यामुळे मोठे नुकसान होत असते. काही वादळांचा वेग कळल्यावर धक्काच बसतो. बांगलादेशात धडकलेल्या ग्रेट भोला चक्रीवादळाने सुमारे 5 लाख लोकांचा जीव घेतला होता, असेच एक चक्रीवादळ 2015 मध्ये पूर्व प्रशांतमध्ये नोंद गेले होते, ज्याचा वेग 215 मैल प्रतितास इतका होता. पृथ्वीच्या अनेक हिस्स्यांमध्ये अशी भयानक वादळं येतात, जी घरांपासून गाड्यांपर्यंत गवताप्रमाणे उडवून लावतात. ऑस्ट्रेलियाच्या बॅरो आयलँडमध्ये नेहमी वादळी वारे वाहत असतात. 10 एप्रिल 1996 रोजी येथे भीषण वादळ आले होते, ज्यात 408 किलोमीटर प्रतितास वागेन वारे वाहिले होते.
असेच एक वादळ जपानमध्ये आले होते. जपानमध्ये 1961 मध्ये आलेल्या नॅन्सी वादळाला देखील अत्यंत धोकादायक मानले गेले होते, याचा वेग 346 किलोमीटर प्रतितास इतका अधिक होता. अमेरिकेच्या ओक्लाहोमामध्ये देखील वारंवार अधिक तीव्रतेची वादळं येत असतात. 3 मे 1999 रोजी ब्रिज कीकीनजीक वादळ आले होते, ज्याचा वेग 302 मैल प्रतितास इतका होता. अशाचप्रकारे दक्षिण समुद्रात देखील सातत्याने वादळं निर्माण होत असतात. तेथे वाऱ्याचा वेग 100 ते 160 किलोमीटर प्रतितास इतका असतो.
अंटार्क्टिकामध्ये देखील अनेक मोठ्या तीव्रतेची हिमवादळं येत असतात. 6 मे 1913 रोजी येथे सर्वात धोकादायक चक्रीवादळ आले हेते, ज्यात वाऱ्याचा वेग 153 किलोमीटर प्रतितास इतका नोंद करण्यात आला होता असे सांगण्यात येते.