सर्वात धोकादायक रोप
स्पर्श करताच होतो मृत्यूशी सामना
झाडांबद्दल आवड असणे चांगले मानले जाते, अनेकदा शहरांमध्ये लोक सकाळ होताच उद्यानांमध्ये फेरफटका मारण्यास जात असतात. तेथील हिरवाईने नटलेली वृक्षसंपदा पाहून मन प्रफुल्लित होत असते. परंतु जगात एक असे रोप आहे जे लोकांच्या मृत्यूचे कारण ठरत असते. या रोपाला सुसाइड प्लांट देखील म्हटले जाते.
जगातील सर्वात धोकादायक रोप म्हणवून घेणारे हे रोप ऑस्ट्रेलियात आढळून येते. या रोपाचे शास्त्राrय नाव डेंड्रोक्नाइड मोरोइड्स आहे. सामान्य बोलीभाषेत याला जिंपी म्हटले जाते. हे रोप दिसण्यास अत्यंत आकर्षक वाटते, याची पाने हृदयाच्या आकाराची असतात. परंतु जर कुणी या रोपाला स्पर्श केल्यास त्याला असह्य वेदनांना सामोरे जावे लागते. या वेदनांचे स्वरुप तीव्र असल्याने कधी कधी लोकांचा जीवही जात असतो. या रोपाच्या पानांच्या पृष्ठभागावर छोटे छोटे काटे असतात, ते सहजपणे दिसून येत नाहीत. त्यांना स्पर्श करताच हे काटे त्वचेत शिरतात आणि ते बाहेर काढले जात नाही तोवर वेदना होत राहते.
या रोपाच्या पानांवरील काटे अत्यंत छोटे आणि विषारी असतात. हे काटे त्वचेत शिरताच अनेक दिवसांपर्यंत बाहेर पडत नाहीत. आतापर्यंत याच्या वेदनेवर कुठलेच औषध निर्माण करता आलेले नाही. म्हणजेच जर कुणी चुकून या रोपाला स्पर्श केला तर त्याचा वेदनेमुळे मृत्यूही होऊ शकतो. याचमुळे या रोपाला सुसाइड प्लांट देखील म्हटले जाते