For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्वात धोकादायक खाण फिलिपाईन्समध्ये

06:29 AM Jul 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
सर्वात धोकादायक खाण फिलिपाईन्समध्ये
The most dangerous mine is in the Philippines.
Advertisement

 फिलिपाईन्समध्ये एक अशी खाण आहे, ज्यातून सोने बाहेर काढण्यासाठी मजुरांना समुद्र किंवा नदीमध्ये अनेक तास बुडून काम करावे लागते. येथे कुठलीच मोठी यंत्रसामग्री नाही तसेच सुरक्षेची उपकरणे नाहीत. केवळ एक जुना कॉम्प्रेसर आणि तोंडात पकडलेली प्लास्टिकची नळी आहे. हे आहे कॉम्प्रेसर मायनिंगचे धोकादायक स्वरुप असून ते जगातील सर्वात जोखिमयुक्त खाणप्रक्रियांपैकी एक मानले जाते.

Advertisement

येथील मजूर अंधारयुक्त अन् अस्वच्छ पाण्यात 10-40 फूट खोलपर्यंत उतरतात. तेथे ते हाताने चिखल आणि दगड शोधतात, बॅगेत भरतात आणि वरील साथीदार त्यांना खेचून बाहेर काढतात. या प्रक्रियेत सोन्याचे काही प्रमाण मिळते, परंतु किंमत मोजावी लागते, स्वत:च्या जीवाची.

मजूर तोंडात प्लास्टिकची नळी पकडून डिझेलने संचालित कॉम्प्रेसरच्या मदतीने श्वास घेतात. पाणी अत्याधिक अस्वच्छ असते, काहीच दिसून येत नाही. ते अंधारातच भिंतींना खणतात, अनेकदा भुयार कोसळते किंवा कॉम्प्रेसर बंद पडतो, ज्यामुळे मजूर तेथेच चिरडून किंवा बुडून मृत्युमुखी पडतो. या खाणीत बुडण्याचा धोका आहे. नळी तोंडातून सुटताच श्वास बंद होऊ शकतो. पाण्यात खोदण्यात आलेले भुयार अस्थिर असल्याने ते कधीच कोसळू शकते. वारंवार वर खाली केल्याने रक्तात गॅस तयार होतो, जो जीवघेणा असतो. याचबरोबर सोने बाहेर काढण्यासाठी मर्क्यूरीचा वापर केला जातो, जो दीर्घकाळात मानवी शरीराला नष्ट करू शकतो.

Advertisement

9-17 वयोगटातील मुले देखील या कामात सामील असतात, फिलिपाईन्समध्म्ये हजारो मुले छोट्या स्तराच्या सोन्याच्या खाणींमध्ये काम कतात. 2014 मध्ये एका 17 वर्षीय मुलाचा भुयारात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाला होता. तरीही गरीबीमुळे लोक हे काम करत असतात.

फिलिपाईन्स जगातील सर्वात मोठ्या सोन्याचा साठा असलेल्या देशांपैकी एक आहे. गरीब लोक रोजगाराच्या अभावामुळे या अनौपचारिक खाणीत काम करतात. एका दिवसाच्या मेहनतीतून काही ग्रॅम सोने प्राप्त होते, जे त्यांच्या परिवाराला काही दिवसांसाठी अन्न पुरविते. परंतु दीर्घकाळात आरोग्य उद्ध्वस्त होते. फिलिपाईन्स सरकारने 2012 मध्ये कॉम्प्रेसर मायनिंगवर बंदी घातली होती. तरीही दुर्गम भागांमध्ये हे अद्याप जारी आहे. स्थानिक व्यापारी या कामाला वित्तपुरवठा करतात आणि मजुरांचे शोषण होते.

Advertisement
Tags :

.