सर्वात सुंदर गाव
ब्रिटनमधील बिबरी हे गाव सर्वात सुंदर मानले जाते. स्वत:च्या अनोख्या सौंदर्यामुळे या गावाला जगातील सर्वात सुंदर गाव घोषित करण्यात आले आहे. ब्रिटनच्या कॉटस्वोल्डस क्षेत्रातील हे गाव शतकांपासून स्वत:च्या प्राचीन बलुआ दगडातील घरं आणि सुंदर कॉटेज गार्डन्ससाठी प्रसिद्ध आहे.
फोर्ब्सने जगातील 50 सर्वात सुंदर गावांची यादी जारी केली असून यात इंग्लंडच्या कॉट्सवॉल्डसचे हे छोटेसे बिबरी गाव सर्वात वर आहे. या गावाला याचे सुंदर चिंचोळ्या गल्ल्या, मधाच्या रंगाच्या कॉटेज आणि शतकांपेक्षा जुन्या इतिहासामुळे निवडले गेले आहे. या सन्मानामुळे बिबरीला जगभरात आणखी प्रसिद्धी मिळाली आहे. बिबरी एखाद्या वॉटरकलर पेंटिंगप्रमाणे खुलते, जेथे मधाच्या रंगाच्या कॉटेज एका रांगेत उभ्या आहेत. येथून वाहणारी नदी कोल्न फुलांमधून वाहते आणि त्यात बदकं आरामात संचार करताना दिसून येतात.
सुंदरतेचा लाभ बिबरी गावाला झाला, परंतु आता येथील 600 स्थानिक रहिवासी अतिपर्यटनामुळे वैतागून गेले आहेत. मुख्य हंगामात येथे दररोज सुमारे 50 मोठे टूरिस्ट कोच पोहोचतात. आमच्या येथे अनेक सुंदर जागा आहेत, ज्या आम्ही जगाला दाखवू इच्छितो, परंतु येथे होणाऱ्या गर्दीमुळे आम्ही त्रस्त आहोत असे एक स्थानिक रहिवाशाने म्हटले आहे.