For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जगातील सर्वात सुंदर कॉलेज

08:30 PM Jul 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
जगातील सर्वात सुंदर कॉलेज
Advertisement

जगभरात अनेक विद्यापीठे आहेत, जी स्वत:च्या शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहेत. परंतु पोलंडमधील व्रोकलॉ विद्यापीठ स्वत:च्या भव्य आणि मनमोहक वास्तुकलेसाठी वेगळे स्थान राखून आहे. याला जगातील सर्वात सुंदर कॉलेज मानले जाते, येथील क्लासरुम, हॉल आणि इमारती पाहून जणू एखादी परीकथा जिवंत झाल्याचे वाटू लागते.

Advertisement

कॉलेजचे विद्यार्थी येथे क्लास बंक करण्याऐवजी दररोज येण्यासाठी उत्साहित असतात. व्रोकलॉ विद्यापीट पोलंडच्या व्रोकलॉ शहरात आहे. याची स्थापना 1702 साली झाली होती आणि हे पोलंडमधील सर्वात जुने अन् प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक आहे. परंतु याची प्रसिद्धी केवळ शिक्षणामुळे नाही. याच्या इमारती गोथिक, बारोक आणि रेनेसां शैलीचे अद्भूत मिश्रण दर्शविणाऱ्या आहेत.

कलेचा उत्तम नमुना

Advertisement

लाल विटांच्या भव्य इमारती, उंच उंच छतं, रंगीत काचा असलेल्या खिडक्या, नक्षीदार स्तंभ, विशाल लायब्रेरी पाहून कुणीही मंत्रमुग्ध होऊन जातो. इतक्या सुंदर ठिकाणी शिक्षण घेणे खरोखरच एक अनोखा अनुभव आहे. क्लासरुम इतके आकर्षक आहेत की शिकता शिकताना लक्ष विचलित होते. विद्यापीठाची मुख्य वास्तू, ऑडिटोरियम आणि अंतर्गत सभागृह इतका आकर्षक आहे की पर्यटक देखील तो पाहण्यासाठी खासकरून येत असतात. अनेक लोक याला ‘पऱ्यांचा महाल’ असे संबोधितात.

शिक्षणही दर्जेदार

पोलंडमध्ये शिक्षणाची गुणवत्ताही अत्यंत चांगली मानली जाते. व्रोकलॉ विद्यापीठात इंजिनियरिंग, सायन्स, ह्यूमॅनिटीज, लॉ आणि मेडिसीन यासारखे अनेक अभ्यासक्रम शिकविले जातात. येथे कमी शुल्क, चांगल्या सुविधा आणि जागतिक स्तराचे शिक्षण मिळते. याचमुळे जगभरातील विद्यार्थी येथे शिकण्यासाठी येत असतात. भारतीय विद्यार्थ्यांसाठी देखील हे विद्यापीठ आकर्षक पर्याय आहे. अनेक भारतीय येथे उच्च शिक्षण घेत आहेत. कॅम्पसची सुंदरता मनाला शांत करते आणि शिक्षणात मदत करते असे तेथील भारतीयांचे सांगणे आहे. व्रोकलॉ शहराला पोलंडचे व्हेनिस देखील म्हटले जाते. कारण येथे नद्या आणि जुन्या इमारतींचे प्रमाण अधिक आहे, विद्यार्थी शिक्षणासोबत शहर हिंडण्याचा आनंद घेत असतात.

Advertisement
Tags :

.