For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्वात सुंदर दफनभूमी

06:30 AM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
सर्वात सुंदर दफनभूमी
Advertisement

रात्री वास्तव्यासाठी येतात लोक

Advertisement

दफनभूमीचे नाव ऐकताच मनात भीती निर्माण होते, परंतु स्वीत्झर्लंडमध्ये एक अशी दफनभूमी आहे, जी इतकी सुंदर आहे की लोक येथे फिरण्यासाठी, फोटो काढणे आणि रात्री वास्तव्य करण्यासाठी येत असतात.  हे ठिकाण मृत्यूलाही सुंदरतेशी जोडणारे आहे. स्वीस दफनभूमी फुलांनी, उद्यानांनी आणि कलात्मक सजावटीने युक्त असतात. सर्वात अचंबित करणारी गोष्ट म्हणजे येथे लोक फोटो काढून घेण्यासाठी येत असतात.

येथे प्रत्येक थडग्यावर रंगबिरंगी फुलं असतात, यात गुलाब, ट्यूलिप, लॅवेंडर आणि अन्य फुलांनी सजलेली थडगी पाहण्याजोगी असतात. स्वीत्झर्लंडमध्ये दफनभूमीला उद्यानाप्रमाणे सजविण्यात येते, येथे बेंच, कारंजी, झोपाळे आणि रोपं असतात. परिवार थडग्यांना घरासारखे स्वरुप देतात, यात फुले लावली जातात, छोटे उद्यान तयार केले जाते आणि नियमित सफाई करण्यात येते. ही परंपरा शतकांपेक्षा जुनी आहे. स्वीस संस्कृतीत मृत्यूला जीवनाचा हिस्सा मानण्यात येते, यामुळे दफनभूमीला उदास नव्हे तर शांत आणि सुंदर ठिकाण केले जाते.

Advertisement

या दफनभूमीत पर्यटक फोटोग्राफीसाठी येत असतात. अनेक लोक रात्री येथे फिरण्यासाठी येतात, कारण प्रकाशात फुले आणि थडगी जादुई वाटतात. परंतु स्वीस दफनभूमी भुतांच्या कहाण्या कमी आहेत, परंतु रात्रीच्या वेळी शांतता आणि सुंदरतेमुळे लोक रोमांचित होतात. येथे दफनभूमी हवामान आणि संस्कृतीशी जोडलेल्या आहेत. स्वीत्झर्लंडचे थंड हवामान आणि हिरव्यागार निसर्गामुळे फुलझाडे सहजपणे उगवतात. लोक थडग्यांवर वर्षभर फुले ठेवतात. काही दफनभूमींमध्ये छोटे-छोटे मेमोरियल गार्ड असतात, जेथे परिवार पिकनिकसारखे वातावरण तयार करतात. हे ठिकाण मृत्यूच्या भीतीला कमी करते आणि जीवनाच्या सुंदरतेची आठवण करून देते.

Advertisement
Tags :

.