For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्वात सुंदर दफनभूमी

07:00 AM Sep 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
सर्वात सुंदर दफनभूमी
Advertisement

दफनभूमीचे नाव ऐकताच अनेक लोकांसमोर वेगळ्या प्रकारचे चित्र उभे राहते. सर्वसाधारणपणे लोक दफनभूमीला फिरण्याचे स्थान मानत नाहीत. परंतु जगात काही अशी ठिकाणं आहेत, जी या विचाराला पूर्णपणे बदलतात. तेथे थडग्यांदरम्यान सुंदर इमारती, पुतळे आणि नक्षीकाम दिसून येते. असेच एक अनोखे ठिकाण इटलीच्या मिलान शहरात आहे. या दफनभूमीला मॉन्यूमेंटल सेमिट्री  या नावाने ओळखले जाते. याची भव्य इमारत आकर्षक कलाकुसर पाहून तुम्ही एखादा जुना राजमहाल, ऐतिहासिक संग्रहालय किंवा सुंदर  रेल्वेस्थानकासमोर उभे आहात असे वाटू शकते. मॉन्यूमेंटल सेमिट्रीचे सर्वात मोठे वैशिष्ट्या याची स्थापत्यकला आहे. येथील मोठमोठ्या इमारती, थडगी आणि स्मारकांवर अत्यंत बारकाईने नक्षीकाम केल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी तयार करण्यात आलेले पुतळे इतके सुंदर आहेत की ते पाहून तुम्ही एखाद्या कलादालनात आल्याचे वाटू शकते. या जागेचा परिसर अत्यंत व्यवस्थित आणि स्वच्छ आहे.

Advertisement

कला अन् इतिहासाची झलक

हे ठिकाण केवळ थडग्यांसाठी प्रसिद्ध नाही. येथे असलेली वेगवेगळी स्मारकं आणि पुतळे स्वत:मध्ये इतिहास आणि कलेची कहाणी सामावून आहेत. याचमुळे हे ठिकाण केवळ स्थानिक लोकांसाठी नव्हे तर इतिहास अन् कलेत रुची बाळगणाऱ्या पर्यटकांसाठी देखील खास मानले जाते. येथे अनेक मोठी स्मारकं दिसून येतात तसेच अत्यंत सुंदर पुतळे आणि दगडांवर करण्यात आलेले नक्षीकाम लक्ष वेधून घेते.

Advertisement

परिसराबाहेर फुलांची दुकाने

दफनभूमीबाहेरील दृश्यही खास आहे, येथे पर्यटक आणि लोकांसाठी फुलांची अनेक दुकाने आहेत. लोक रंगबिरंगी फुले खरेदी करत स्वत:च्या प्रियजनांच्या थडग्यांवर ठेवू शकतात. फुलांची सजावट आणि त्यांचा गंध या ठिकाणाच्या वातावरणाला आणखी सुंदर करून सोडतो. दफनभूमी असूनही येथील वातावरण भीतीदायक कमी अन् शांत अधिक जाणवते. मोठमोठ्या इमारती आणि कलाकृतींदरम्यान फिरताना इतिहासाच्या जुन्या काळात पोहोचल्याचे वाटू लागते. याचमुळे मिलानला येणाऱ्या अनेक पर्यटकांसाठी मॉन्यूमेंटल सेमिट्री एक वेगळ्या प्रकारचा अनुभव ठरते. मॉन्यूमेंटल सेमिट्रीमध्ये मृत्यू आणि आठवणींदरम्यान कला, इतिहास आणि सौंदर्याचा मेळ दिसून येतो.

Advertisement
Tags :

.