For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चंद्र आंकुचि पावतोय

06:11 AM Oct 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
चंद्र  आंकुचि  पावतोय
Advertisement

चंद्रावर 10 हजारांहून अधिक भेगा, कधीही होऊ शकतो भूकंप

Advertisement

चंद्राच्या पृष्ठभागावर 10 हजारांहून अधिक असेफॉल्ट मिळाले आहेत, जेथे भूकंप होऊ शकतो. नासाच्या लूनर रिकॉनिसेंस ऑर्बिटर कॅमेराच्या (एलआरओसी) छायाचित्रांचे अध्ययन करणाऱ्या वैज्ञानिकांनी ही माहिती दिली आहे. वैज्ञानिकांनुसार चंद्राचा अंतर्गत हिस्सा हळूहळू थंड होत असून यामुळे चंद्राचा आकार कमी होतोय. मागील सुमारे 40 कोटी वर्षांमध्ये चंद्राची त्रिज्या जवळपास 45 मीटरने कमी झाली आहे. या शोधामुळे चंद्रावर माणूस उतरविण्याची तयारी करणाऱ्या नासाच्या आर्टेमिस मिशनसाठी सुरक्षित ठिकाण निवडणे आणखी आवश्यक ठरले आहे.

वैज्ञानिकांनी चंद्राच्या पृष्ठभागावर लांब आणि उभरत्या संरचनांचे अध्ययन केले. त्यांना लोबेट स्कार्प आणि मारे रिज म्हटले जाते. या संरचना चंद्र आकुंचित पावण्याचे कारण ठरतात. चंद्राचा आकार कमी होतो, तेव्हा त्याच्या पृष्ठभागावर दबाव पडतो. यामुळे फॉल्ट निर्माण होतात, या फॉल्टमध्ये हालचाली झाल्यावर चंद्रावर भूकंप होऊ शकतो.

Advertisement

कुठे मिळाले फॉल्ट?

वैज्ञानिकांनी नासाच्या एलआरओसी कॅमेऱ्याद्वारे मिळालेल्या छायाचित्रांचे विश्लेषण केले. यात चंद्रावर 8900 हून अधिक लोबेट स्कार्प आणि 2000 हून अधिक छोट्या मारे रिज मिळाल्या. या दोन्ही संरचना चंद्र आकुंचित पावल्यामुळे पृष्ठभागावर होणाऱ्या बदलांशी निगडित आहेत. अध्ययनानुसार मागील सुमारे 40 कोटी वर्षांमध्ये चंद्राची त्रिज्या 45 मीटर कमी झाली. चंद्र याच वेगाने आकुंचित पावत राहिल्यास दर 10 लाख वर्षांमध्ये त्याची त्रिज्या जवळपास 6 ते 11 सेंटीमीटरने कमी होऊ शकते.चंद्रावर भूकंप का होतात?

चंद्राचा अंतर्गत हिस्सा हळूहळू थंड होतोय. थंड होत असल्याने त्याचा आकार आंकुचित पावत आहे. यामुळे त्याच्या पृष्ठभागावर दबाव पडतो. या दबावामुळे नवेफॉल्ट निर्माण होऊ शकतात किंवा पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या फॉल्टमध्ये हालचाली घडू शकतात. या हालचालींमुळे चंद्रावर भूकंप घडतात. या भूकंपांना मूनक्वेक म्हटले जाते. 2019 मध्ये वैज्ञानिक टॉम वॉटर्स आणि त्यांच्या टीमने देखील चंद्राच्या पृष्ठभागावर फॉल्ट आणि भूकंपादरम्यान संबंधांचे पुरावे दिले होते. अपोलो मिशनदरम्यान चंद्रावर लावण्यात आलेल्या सीस्मोमीटरने भूकंपाची नोंद केली होती. या भूकंपांचे केंद्र फॉल्टच्या अत्यंत नजीक होते. यामुळे वैज्ञानिकांना चंद्राच्या पृष्ठभागावर दिसणाऱ्या या संरचना भूकंपाशी निगडित असू शकतात, हे कळले.

पृथ्वीपेक्षा कसा वेगळा ?

पृथ्वीचे बाहेरील आवरण सुमारे 15 मोठ्या प्लेट्समध्ये विभागलेले आहे. पृथ्वीवर होणाऱ्या जवळपास 90 टक्के टेक्टोनिक आणि भूकंपीय हालचाली या प्लेट्सच्या सीमांनजीक होतात. चंद्राचे बाहेरील आवरण एका मोठ्या प्लेटप्रमाणे आहे. तेथे पृथ्वीप्रमाणे अनेक मोठ्या प्लेट्स नाहीत, ज्या सातत्याने एकमेकांना धडकत असतात. यामुळे चंद्रावर भूकंप होण्याच्या जागेचा शोध घेणे अवघड आहे. तेथे जुन्या

फॉल्टमध्ये हालचाली होऊ शकतात, किंवा नवे फॉल्ट निर्माण होऊ शकतात. यामुळे भूकंप होण्याचा धोका कायम राहतो. चंद्राचा अंतर्गत हिस्सा थंड होणे आणि आंकुचित पावण्याचे सत्र जारी आहे. अशास्थितीत जुन्या फॉल्टमध्ये हालचाली होऊ शकतात आणि नवे फॉल्ट निर्माण होऊ शकतात, याचमुळे चंद्रावर माणसांना सुरक्षित उतरविण्यासाठी अशा ठिकाणांचे अध्ययन करणे आवश्यक आहे.

Advertisement
Tags :

.