कोदवलीतील एकाश्म मंदिरे ही शैव पाशुपत सांप्रदायाची अधिष्ठान केंद्र
राजापूर :
तालुक्यातील कौदवती गावात एकूण सात एकाश्म मंदिरे नव्याने सापडली आहेत कोदवली साहेबाचे धरण, शकरेश्वर मंदिर, कोदवली मांडवकरवाडी, देवाचे गोठणे सोगमवाडी आणि पांगरे येथे आढळून आली आहे. कोदवली नदी किनारी सापडलेली एकपाषाणी मंदिरे ही शेव नाशुपत सांप्रदायातील महत्त्वाची अधिष्ठान केंद्र असावीत असा निर्वाळा इतिहास संशोधक अनिल दुधाणे यांनी दिला. यापूर्वीही पांगरे येथे अशीच एकाश्ण मंदिरे व लेणी सापडली होती. त्यावरून राजापूर हे पाशुपत सांप्रदायाचे अधिष्ठान केंद्र असल्याचे दिसून येते.
कोदवलीतील साहेबाच्या धरणाजवळ एकूण चार एकाश्म मंदिरे आढळून आली आहेत. त्यातील दोन पूर्ण तर दोन अपूर्ण अवस्थेत आहे. मंदिराचे दरवाजा आणि गर्भगृह असे दोन भाग दिसून येतात. गर्भगृहात अधिष्ठान असून ते बौकोनी आकाराचे आहे अधिष्ठानावर गोलाकार खड्डा असून त्यावर ग्रेनाईट शिवलिंग बसवलेले असावे. यातील एक मंदिर हे आकाराने लहान असून ते अपूर्णावस्थेत आहे.

दरम्यान कोदवली शंकरेश्वराच्या मंदिराजवळ आढळलेले एकास्म मंदिर हे मंदिर पूर्ण जांब्या दगडात असून ग्रामस्थांनी सध्या मात्र त्यावर प्लास्टर केले आहे मंदिरास आयताकृती प्रवेशदार असून आतमध्ये चौकोनी गर्भगृह आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला अधिष्ठान असून चौकोनी आकाराचे शिवलिंग कोरलेले आहे. शिवलिंगातील अभिषेकाचे पाणी बाहेर जाण्यासाठी मंदिरास एक वारी मार्ग तयार केलेला आहे. मंदिराचा कळस मात्र त्रिकोणी पिरॅमिडप्रमाणे निमुळता होत गेलेल्ला दिसतो. तर कोदवली मांडवकरवाडी येथे ब्राह्मणदेव बहाळाजवळ दोन एकाश्म मंदिरे आढळून आली आहेत. ही दोन्ही मंदिरे आकाराने मोठी असून यांचे दोन्ही दरवाजे चौकोनी आहेत.
देवाचे गोठगे सोगमवाडी येथेही नागघोबा नावाने प्रतिद्ध असणारे एकाम्म मंदिर आढळून आले असून हे मंदिरही आकाराने मध्यम स्वरुपाचे आहे. पाचा दरवाजाही चौकोनी असून गर्भगृहात बौथरा आहे व त्यावरच अधिष्ठान देवता कोरलेली आहे. स्थानिक लोक त्याला नागयौघा नावाने ओळखातात. तर काही वर्षापूर्वी अशीच काही एकाश्म मंदिरे तालुक्यातील पांगरे बुद्रुक येथे आढळून आली आहेत
या मंदिरांच्या अभ्यासाअंती इतिहास संशोषक अनिल दुधाने मांनी काही निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यामध्ये राजापूर हे प्राचीन काळापासून व्यापारी बंदर आहे. अर्जुना नदीच्या खाडीमागे राजापूरपर्यंत व्यापारी माल येऊन तो पश्चिम घाटमाथा मार्गे कोल्हापूर परिसरात जात होता. बाच मार्गावर ही एकाश्म मंदिर स्थापन केलेली दिसतात. सर्व मंदिरांची रचना पाहता हे एक धार्मिक उपासनेचं केंद्र असावं असं त्यांचं मत आहे.
या मंदिरातील अधिष्ठान रचना पाहता हे शेत्र पाशुपत संप्रदायातील महत्वाचे केंद्र असाचे राजापूरची गंगा, घोपेश्वराचं प्राचीन मंदिर, पांगरे बुद्रुक येथे सापडलेले लेणी पाचव्या ते सहाव्या शतकातील असल्यामुळे हे एक शैव केंद्र असावे. इसवी सनाच्या चौथ्या पाचव्या शतकात शेव, वैष्णव पंचाचा प्रभाव वाढलेला पाहायला मिळतो पुढे सहाव्या शतकात या चळवळीने जोर परल्याचे त्यांनी सांगितले.
- प्राचीन अर्वाचिन काळाचा ठेवा
कोकण जसे निसगनि समृद्ध आहे तसे विविध चमत्काराने सुधा भरलेले आहे, अश्मयुगापासून इसवी सनाच्या पूर्व काळापर्यंत मानवी संस्कृतीचा घटक म्हणून सापडलेली कातळ शिल्प पुरातत्व वारशाची खाण म्हणजे कोकण भूमी असून आता सापडलेली एकाश्म मंदिरे हा राजापूरच्या प्राचीन अर्वाचिन काळाचा ठेवाड आहे.
- अनिल दुधाने, इतिहास संशोधक, पुणे
- एकाश्म मंदिर म्हणजे काय
एकाच शिलाखंडातून मंदिराची संपूर्ण वास्तू आंतरबादा स्वरुपात साकार करणे म्हणजे एक पाषाणी मंदिर घडवणे होय. एक पाषाणी मंदिर ही एक प्रकारे मूर्तिशिल्प या प्रकारात येतात. एका अखंड शिळेतून नकी असलेला भाग खोदून तयार केलेल्या स्थापत्यास एकाभ्म मंदिर असे म्हणतात. यात शाला आच्छादन, गर्भग्रह, त्तम, सभामंडप, शिखर, अधिष्ठान हे सर्व घटक एकाच पाषागात निर्माण केलेले असतात. मात्र जयन स्थापत्य आणि एकात्म मंदिर पात फरक असतो.