For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कचऱ्याच्या डोंगरांमुळे वाढतोय शहरांचा पारा

06:34 AM Apr 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
कचऱ्याच्या डोंगरांमुळे वाढतोय शहरांचा पारा
Advertisement

हवेत ट्रॅप होतेय सूर्याची उष्णता

Advertisement

तुम्ही कुठल्याही शहरात जा, तेथे तुम्हाला कचऱ्याचा डोंगर अवश्य दिसून येईल. एका नव्या अध्ययनात हा कचरा डंप मोठ्या प्रमाणात मिथेन वायू उत्सर्जित करत असल्याचे आढळून आले आहे. मिथेन वायूमुळेच जागतिक तापमानवाढ आणि शहरांमधील तापमानात वाढ होत आहे. कार्बन मॅपर नावाच्या संस्थेचे संस्थापक राइली डुरे यांनी हे अध्ययन अमेरिकेतील 1200 कचरा डंपवर करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

कचऱ्याचे हे डेंगर आमची शहरं, राज्य, देश आणि जगात हवामान  बदल घडवून आणत असल्याचे या अध्ययनातून स्पष्ट झाले आहे. यापूर्वी कचरा डंपवरून अशाप्रकारचे अध्ययन करण्यात आले नव्हते. हे अध्ययन समाजाला खडबडून जागं करणारं आहे.

Advertisement

मिथेन उत्सर्जन सर्वसाधारणपणे तेल आणि वायू उत्पादनावेळी होत असते, किंवा गुरांमध्ये होते. या घटकांवर नजर ठेवली जात होती. कार्बन डाय ऑक्साइडप्रमाणेच मिथेन देखील एक प्रमुख ग्रीनहाउस गॅस आहे. यामुळे जग तप्त होत आहे.

मिथेन आकाशात एक अदृश्य आच्छादन तयार करतो, ज्यामुळे सूर्याची उष्णता वायुमंडळाच्या बाहेर जात नाही, यामुळे उष्णता वाढते. मिथेन वायुमंडळात कमी कालावधीसाठीच राहतो, परंतु कार्बन डायऑक्साइडपेक्षा 80 पट अधिक उष्णता रोखतो. मिथेनइतकी उष्णता रोखून धरण्यासाठी कार्बन डायऑक्साइडला 20 वर्षांचा कालावधी लागतो.

अमेरिकेत माणसांमुळे मिथेन उत्सर्जन अत्यंत अधिक होत असल्याचा एनवायरमेंटल प्रोटेक्शन एजेन्सीचा अनुमान आहे. हे उत्सर्जन अमेरिकेत 2.30 कोटी वाहनांद्वारे एक वर्षात होणाऱ्या उत्सर्जनापेक्षा अधिक आहे. म्हणजेच हवामान बदल, जागतिक तापमानवाढीची तीव्रता वाढते, दुष्काळाचे प्रमाण अधिक दिसून येत आहे.

कचऱ्याच्या डोंगरात काम करणाऱ्या लोकांना मिथेनमुळे शारीरिक समस्या उद्भवत आहेत. याचबरोबर कचऱ्याच्या डोंगराच्या आसपासचा भाग प्रदूषित राहाते, हवेत हानिकारक घटक मिसळले जातात. खाद्यपदार्थांच्या कचऱ्यातून मोठ्या प्रमाणात मिथेन वायू निघतो, यामुळे कचऱ्याच्या डंपच्या आजूबाजूच्या परिसरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. कचऱ्याच्या डंपमध्ये मोठ्या प्रमाणात मिथेन जमा असतो, यामुळे तेथे आग लागण्याचा धोका वाढतो. ही आग लवकर विझत नाही. अनेकदा कित्येक दिवसांपर्यंत पेटत राहते.

Advertisement
Tags :

.