For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Asha Bhosle | सुरांची साथ सुटली! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन

01:12 PM Apr 12, 2026 IST | NEETA POTDAR
asha bhosle   सुरांची साथ सुटली  ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन
Advertisement

                          आशा भोसले यांच्या निधनाच्या वृत्ताने संगीतविश्वात खळबळ

Advertisement

मुंबई: भारतीय संगीत क्षेत्राचा मानबिंदू आणि कोट्यवधी रसिकांच्या लाडक्या आशाताई, अर्थात आशा भोसले यांनी आज जगाचा निरोप घेतला. वयाच्या ९३ व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्ण युगाचा अंत झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी आशाताईंना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल, अशी आशा व्यक्त केली जात होती; मात्र आज त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

Advertisement

१२ हजार गाण्यांचा वारसा:
आशा भोसले यांनी सात दशकांहून अधिक काळ आपल्या आवाजाने चित्रपटसृष्टी गाजवली. केवळ मराठी आणि हिंदीच नव्हे, तर विविध भाषांमधून त्यांनी तब्बल १२ हजारहून अधिक गाणी गायली आहेत. शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, लावणीपासून ते पॉप म्युझिकपर्यंत सर्वच प्रकारात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता.

आशाताईंच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूड आणि जागतिक संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. एका महान गायिकेच्या जाण्याने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

Advertisement
Tags :

.