For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विरोधी गटाच्या नगरसेवकांनी तक्रार करताच बैठक रद्द

06:55 AM Jan 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
विरोधी गटाच्या नगरसेवकांनी तक्रार करताच बैठक रद्द
Advertisement

काही अधिकाऱ्यांना लक्ष्य बनविण्याचा प्रकार थांबणे गरजेचे

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

महानगरपालिकेमध्ये शनिवारी सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीची बैठक होणार होती. मात्र विरोधी गटाच्या नगरसेवकांनी वारंवार बैठका घेतल्यामुळे त्याचा परिणाम कार्यालयीन कामकाजावर होत आहे, अशी तक्रार केली. याचबरोबर प्रादेशिक आयुक्त यांच्याकडे तक्रार करू, असे सांगताच बैठक रद्द करण्यात आली आहे. यामुळे अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

Advertisement

विविध स्थायी समितींच्या बैठका वारंवार घेतल्या जात आहेत. त्यामुळे इतर कामांवर त्याचा परिणाम होत आहे. महत्त्वाचे म्हणजे बऱ्याचवेळा स्थायी समितीच्या चेअरमनसह नगरसेवकही अधिकाऱ्यांना नाहक लक्ष्य बनविण्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, तसेच सरकारी नियमानुसार कामे करत असतात. मात्र एखाद्या विषयावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याचे प्रकार सुरू आहेत. त्याबाबत तक्रारीही वाढल्या आहेत.

अधिकारी व कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून, तसेच महानगरपालिकेचा सुरू असलेला आंधळा कारभार पाहून नाराजी व्यक्त होत होती. त्यातच आता विरोधी गटाच्या नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठका वारंवार घेणे बंद करा, त्यालाही नियमावली आहे. अचानक नोटीस द्यायची आणि बैठका घ्यायच्या, हा प्रकार थांबला पाहिजे. अन्यथा, याबाबत प्रादेशिक आयुक्तांकडे तक्रार करू, असे सांगताच बैठक रद्द करण्यात आली.

शनिवारी सार्वजनिक स्थायी समितीची बैठक घेण्याचे ठरविण्यात आले. मात्र विरोधी गटाच्या नगरसेवकांनी तक्रार देताच बैठक रद्द केली आहे. यामुळे अधिकाऱ्यांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. बैठका घ्या, योग्य अशा सूचना करा, मात्र जाणूनबुजून अधिकाऱ्यांना लक्ष्य बनविण्याचे प्रकार थांबवा, असे मत व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.