महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बाजाराची आठवड्याची सुरुवात निराशेनेच

06:47 AM Mar 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 616 अंकांनी घसरणीत : बँकिंग समभाग दबावात

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

भारतीय शेअर बाजारामध्ये सोमवारी घसरण दिसून आली. आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांवर दबाव राहिल्याने शेअरबाजार घसरणीसह बंद झाला होता.

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 616 अंकांनी घसरून 73,502 अंकांवर बंद झाला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकसुद्धा घसरणीसह बंद झाला होता. जवळपास 160 अंकांची घसरण नोंदवत 22,320 अंकांच्या पातळीवर निफ्टी निर्देशांक बंद झाला होता. सेन्सेक्समधील 30 पैकी 22 समभागांमध्ये घसरण दिसून आली तर आठ समभाग तेजीमध्ये व्यवहार करत होते. सोमवारी जिओ फायनान्सचे समभाग जवळपास सहा टक्क्यांसह सर्वाधिक तेजीत राहिले होते. जवळपास 22 रुपयांनी समभाग वाढत 356 रुपयांवर बंद झाला होता.

तसे पाहिल्यास एकंदर पाहता बाजारात नकारात्मकताच अधिक होती. निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले. शेअर बाजारामध्ये अपोलो हॉस्पिटल, नेस्ले इंडिया, एसबीआय लाइफ आणि सिप्ला यांचे समभाग सर्वाधिक तेजीसह बंद झाले होते. तर दुसरीकडे टाटा कंझ्युमर, बजाज ऑटो, पॉवरग्रिड कॉर्प आणि टाटा स्टील यांच्या समभागांनी मात्र नकारात्मक कामगिरी नोंदवली होती.

दिग्गज उद्योजक गौतम अदानी समूहातील दहा लिस्टेड कंपन्यांपैकी पाच कंपन्यांचे समभाग सोमवारी कमकुवत दिसून आले. अदानी समूहातील एसीसी लिमिटेडचे समभाग काहीशी तेजी दर्शवत बंद झाले होते. अदानी विल्मरचे समभाग देखील घसरणीत होते. सोमवारी मुथूट फायनान्स, बजाज फायनान्स आणि आयआरसीटीसी यांचे समभाग अल्पशा तेजीसोबत बंद झाले. एसबीआय कार्ड, अॅक्सिस बँक, फेडरल बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, मारुती सुझुकी यांचे समभाग घसरणीत होते.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article