महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आयटी-बँकिंगच्या तेजीने बाजार सावरला

07:00 AM Apr 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

2 दिवसांची घसरण थांबली : सेन्सेक्स 350 अंकांनी मजबूत

Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisement

भारतीय भांडवली बाजारातील चौथ्या सत्रात गुरुवारी बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक वधारुन बंद झाले आहेत. यामध्ये विविध क्षेत्रांपैकी खासगी बँक आणि आयटी क्षेत्र या क्षेत्रांमधील कामगिरीने बाजाराला मजबूत स्थिती प्राप्त करण्यास यश मिळाले आहे. यामुळे मागील दोन दिवसांच्या घसरणीला पूर्णविराम मिळाला आहे. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 350.81 अंकांनी वधारुन निर्देशांक 74,227.63 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 80.00 अं कांच्या तेजीसोबत निर्देशांक 22,514.65 वर बंद झाला आहे. खासगी बँक व आयटी क्षेत्राची चमक एनएसईमधील निर्देशांकांची स्थिती पाहिल्यास यामध्ये खासगी बँकेचा निर्देशांक 1.12, आयटी 1.08 हे सर्वाधिक तेजीत राहिले आहेत.

चार नवीन निर्देशांक लाँच

राष्ट्रीय शेअर बाजारात गुरुवारी चार नवीन निर्देशांक सादर करण्यात आले आहेत. ते 8 एप्रिल 2024पासून दररोजच्या कामकाजासाठी खुले होणार आहेत. या नवीन निर्देशांकांत टाटा समूह 25 टक्के कॅप, निफ्टी 500 मल्टीकॅप इंडिया मॅन्युफॅक्चिरींग, निफ्टी 500 मल्टीकॅप पायाभूत सुविधा आणि निफ्टी मिडस्मॉल हेल्थकेअर आदींचा समावेश आहे. गुरुवारी सेन्सेक्स, निफ्टी यांनी बाजारात सुरुवात होताच नव्या विक्रमी स्तराला स्पर्श केला होता. मात्र काहीशी घसरण राहिल्याचे दिसून आले. अंतिम क्षणी बाजाराने मजबूत कामगिरी केली. निफ्टीमधील तेजीमधील समभाग वगळता अन्य कंपन्यांमध्ये एफएमसीजी काहीशी घसरण राहिली होती. यासोबतच वाहन, बँक, स्मॉलकॅप, मिडकॅप 100 आणि निफ्टी आर्थिक सेवा देणाऱ्या निर्देशांकांत मजबूत कामगिरी राहिली. एचडीएफसी बँक, टायटन, आयशर मोर्ट्स, टेक महिंद्रा आणि डिव्हीज लॅब यांचा समावेश तेजीत राहिला होता.

समभाग वधारलेल्या कंपन्या

? एचडीएफसी बँक             1527

? टायटन               3786

? टेक महिंद्रा        1277

? एशियन पेन्ट्स   2919

? टीसीएस             4003

? मारुती सुझुकी   12580

? कोटक महिंद्रा   1748

? बजाज फिनसर्व्ह              1655

? एनटीपीसी         354

? विप्रो    487

? महिंद्रा अॅण्ड महिंद्रा         2002

? लार्सन अॅण्ड टुब्रो              3800

? इन्फोसिस          1486

? टाटा मोर्ट्स        1012

? एचसीएल टेक   1539

? इंडसइंड बँक    1545

? अल्ट्राटेक सिमेंट              10001

? आयशर मोर्ट्स  4011

? डिव्हीस लॅब       3740

? अपोलो हॉस्पिटल             6450

? ज्युबिलंट फूड    464

समभाग घसरलेल्या कंपन्या

? स्टेट बँक            759

? भारती एअरटेल 1207

? जेएसडब्लू स्टील              860

? पॉवरग्रिड कॉर्प  277

? आयटीसी           422

? रिलायन्स इंडस्ट्रीज          2926

? बजाज फायनान्स             7287

? नेस्ले    2546

? सनफार्मा           1620

? टाटा स्टील         163

? अॅक्सिस बँक     1062

? आयसीआयसीआय          1076

? हिंदुस्थान युनि   2265

? डाबर इंडिया     505

? कोलगेट             2713

? बीपीसीएल         598

? बँक ऑफ बडोदा             269

? पीआय इंडस्ट्रीज              3827

? अंबुजा सिमेंट    624

? फेडरल बँक      152

? ल्यूपिन               1590

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article