सलग दुसऱया दिवशीही बाजारात तेजी
सेन्सेक्स 427 तर निफ्टी 143 अंकांनी वधारले
वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय भांडवली बाजारातील सलग दुसऱया सत्रात गुरुवारी जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे तेजी कायम राहिल्याचे दिसून आले. यामध्ये दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीच्या जोरावर सेन्सेक्सने 427 अंकांची तेजी प्राप्त केल्याचे दिसून आले.
दिवसभरातील कामगिरीनंतर दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 427.49 अंकांनी वधारत जात निर्देशांक 54,178.46 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 143.10 अंकांनी मजबूत होत निर्देशांक हा 16,132.90 वर बंद झाल्याचे दिसून आले.
सेन्सेक्समधील समभागांमध्ये टायटन, टाटा स्टील, लार्सन ऍण्ड टुब्रो, इंडसइंड बँक, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांचे समभाग तेजीत राहिले आहेत. यासह दुसऱया बाजूला डॉ.रेड्डीज लॅब, नेस्ले, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि बजाज फायनान्स यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले.
जागतिक बाजारांमध्ये आशियातील अन्य बाजारांमध्ये जपानचा निक्की, दक्षिण कोरियाचा कोस्पी, चीनचा शांघाय कम्पोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग हा तेजीसह बंद झाला आहे. युरोपीयन बाजारात सुरुवातीला तेजीचा कल राहिला होता. तर अमेरिकन बाजारात वाढ राहिली होती. जागतिक बाजारातील तेजीचा कल सकारात्मक राहिल्याने देशातील शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण राहिले होते. तसेच दुसऱया बाजूला कच्चे तेल आणि अन्य क्षेत्रात कमी होणाऱया किमतीमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास मजबूत झाल्याचे दिसून आले.
यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय)चा विदेशी चलन साठा वाढत असल्याच्या उपायामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरण थांबण्यास काहीशी मदत होणार असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.05 टक्क्यांनी वधारुन 100.7 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- टायटन............ 2128
- टाटा स्टील......... 900
- लार्सन ऍण्ड टुब्रो 1611
- इंडसइंड बँक....... 861
- महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 1133
- आयसीआयसीआय 741
- कोटक महिंद्रा.... 1739
- एचडीएफसी बँक 1396
- स्टेट बँक............. 486
- सन फार्मा.......... 849
- विप्रो................. 420
- एनटीपीसी......... 140
- टेक महिंद्रा....... 1020
- एशियन पेन्ट्स.. 2890
- पॉवरग्रिड कॉर्प.... 212
- आयटीसी........... 291
- एचडीएफसी..... 2245
- इन्फोसिस........ 1498
- एचसीएल टेक..... 988
- ऍक्सिस बँक........ 658
- वेदान्ता.............. 227
- हिंडाल्को............ 361
- मॅक्स फायनान्स.. 861
- बीपीसीएल........ 329
- पीआय इंडस्ट्रीज 2773
- Ý हॅवेल्स इंडिया 1225
- कोल इंडिया........ 185
- फेडरल बँक........... 97
- सीजी कंझ्युमर..... 368
- आयशर मोर्ट्स... 2934
समभाग घसरलेल्या कंपन्या
- डॉ.रेड्डीज लॅब... 4338
- नेस्ले.............. 18187
- भारती एअरटेल... 686
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2387
- बजाज फायनान्स 5859
- हिंदुस्थान युनि.. 2475
- बजाज फिनसर्व्ह 11965
- मारुती सुझुकी... 8598
- अल्ट्राटेक सिमेंट. 5820
- सिप्ला............... 936
- ब्रिटानिया 3808