For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुरुवातीची चांगली तेजी बाजाराने गमावली

06:46 AM Mar 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
सुरुवातीची चांगली तेजी बाजाराने गमावली
Advertisement

सेन्सेक्स 325 अंकांनी वधारला : आयटी निर्देशांक मजबूत

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात सुरुवातीच्या सत्रात चांगली तेजी दिसून आली होती. पण शेवटच्या सत्रात पुन्हा जागतिक तणावात बाजाराने तेजी गमावल्याचे दिसून आले. सेन्सेक्स 325 अंक तर निफ्टी 112 अंकांनी वाढत बंद झाला होता.

Advertisement

शुक्रवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 325 अंकांनी वाढत 74532 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 112 अंकांनी वाढत 23114 अंकांवर बंद झालेला दिसला. निफ्टी बँक निर्देशांक सुरुवातीला चांगला तेजीत होता पण सरतेशेवटी मात्र 23 अंकांनी घसरत 53427 अंकांवर बंद झाला होता.

हे समभाग मजबूत

शुक्रवारी अखेरच्या दिवशी शेअरबाजारात सुरुवातीला असणारी तेजी शेवटी कमी झालेली दिसून आली. सुरवातीला सेन्सेक्स 750 अंकांनी तेजीत होता. यामध्ये समभागांचा विचार करता जेएसडब्ल्यू स्टील, टेक महिंद्रा, टाटा स्टील, कोल इंडिया, इन्फोसिस, ट्रेंट, रिलायन्स, बजाज ऑटो, सनफार्मा, एनटीपीसी, आयशर मोटर्स, टायटन, एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट, भारती एअरटेल, एसबीआय, महिंद्रा आणि महिंद्रा, आयटीसी, टाटा कंझ्युमर्स, मारुती सुझुकी, ग्रासिम, एशियन पेंटस्, पॉवरग्रिड कॉर्प, लार्सन टुब्रो, सिप्ला, अपोलो हॉस्पिटल, विप्रो, मॅक्स हेल्थकेअर, नेस्ले यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले. तर दुसरीकडे मिडकॅप निर्देशांकातील आयओबी, एस्कॉर्टस् क्युबोटा, एबी फॅशन अँड रिटेल, टाटा इएलक्सएसआय, बँक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय बँक यांचे समभागही तेजी दाखवत बंद होताना दिसले.

हे समभाग घसरणीत

दुसरीकडे इंडिगो, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, जियो फायनान्स, एसबीआय लाइफ, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, अदानी एंटरप्रायझेस, बीईएल, ओएनजीसी, एचडीएफसी लाइफ, हिंडाल्को यांचे समभाग घसरले होते.

Advertisement
Tags :

.