महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बाजारात अंतिम सत्रात काहीशी घसरण

06:51 AM Feb 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 15 अंकांनी प्रभावीत : आयटी व फायनान्शियल समभागांमध्ये दबाव

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

भारतीय भांडवली बाजारात अंतिम सत्रात शुक्रवारी सेन्सेक्समध्ये काहीशी घसरण राहिल्याचे दिसून आले. यासोबतच निफ्टीनेही नवा विक्रम प्राप्त करण्यापर्यंत मजल मारली होती. यामध्ये आयटी आणि काही फायनान्शियल कंपन्यांच्या समभागांमधील नफा कमाईचा फटका हा भारतीय बाजाराला बसल्याचे पहावयास मिळाले आहे.

मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 15.44 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 73,142.80 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 4.75 अंकांनी घसरुन निर्देशांक 22,212.70 वर बंद झाला आहे. दरम्यान बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप यांचे निर्देशांक 0.15 टक्के आणि 0.53 टक्क्यांनी वधारल्याचे पहावयास मिळाले. तर निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक यांचे निर्देशांक मात्र नकारात्मक स्थितीत राहिले होते.

निफ्टी वाहन, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हीसेस यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले. तर शेअर बाजारात तेजी प्राप्त करणाऱ्या टॉपच्या कंपन्यांमध्ये बजाज फिनसर्व्ह, स्टेट बँक ऑफ इंडिया, डॉ.रे•ाrज लॅब, टायटन, एचडीएफसी लाईफ, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा आणि एलटीआय माइंड ट्री यांच्या समभागांचा समावेश राहिला आहे.

अन्य कंपन्यांची स्थिती पाहिल्यास यामध्ये बीपीसीएल, एचसीएल टेक, मारुती सुझुकी, एशियन पेन्ट्स, जेएसडब्ल्यू स्टील, ओएनजीसी आणि एसबीआय यांचे समभाग मात्र घसरणीत राहिले होते.

पेटीएमचे समभाग हे 5 टक्क्यांनी तेजीत राहिले होते. स्टोव्ह क्राफ्ट, इंजिनिअर्स इंडिया, एचडीएफसी लाइफ, आयसीआयसीआय प्रूडेंशियल लाईफ, नेस्ले इंडिया, यासह अन्य समभागांची कामगिरी काहीशी समाधानकारक राहिली होती.

जागतिक पातळीवरील स्थिती

शुक्रवारच्या सत्रात जागतिक बाजारांमधील स्थितीमध्ये तेजीचा कल कायम राहिला होता. कारण यामध्ये चीनचा शांघाय कम्पोझिटचा निर्देशांक वधारुन बंद झाला. तर हाँगकाँगचा हँगसेंग हा स्थिर राहिला होता. जपानचा टोकीओ बाजार हा सुट्टीमुळे बंद राहिला होता. युरोपियन बाजार वधारुन बंद झाला. आयटी कंपनी एनवीडियाचे तिमाही निकाल सकारात्मक राहिल्याचा लाभ झाला आहे.

भारतीय बाजारातील विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी गुरुवारी निव्वळ विक्री केली आहे. त्यांनी जवळपास 1,410.05 कोटी रुपये किंमतीच्या समभागांची विक्री केल्याची नोंद करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article