For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चढ-उताराच्या प्रवासात बाजार घसरला

06:32 AM May 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
चढ उताराच्या प्रवासात बाजार घसरला
Advertisement

सेन्सेक्स 625 अंकांनी नुकसानीत : निफ्टीही प्रभावीत

Advertisement

मुंबई :

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी  चढ-उतारांच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले. जागतिक बाजारातील संमिश्र स्थितीमुळे मंगळवारी  भारतीय शेअर बाजार घसरणीसह उघडले. यामध्ये आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिस सारख्या दिग्गज कंपन्यांच्या घसरणीने बाजाराला आपली तेजी टिकविण्यात यश मिळाले नाही.

Advertisement

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 624.82 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 0.76 टक्क्यांसह 81,551.63 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील अखेर 174.95 अंकांनी घसरून 24,826.20 वर बंद झाला.

बाजार घसरण्याचे कारण?

  1. मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात बहुतेक आशियाई शेअरबाजारात घसरण होती. अमेरिकेतील वाढती वित्तीय तूट आणि अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाल्यामुळे डॉलर निर्देशांक घसरत राहिला. त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून आला.
  2. .एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिस सारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये विक्री राहिल्याने निफ्टी 50 आणि सेन्सेक्स सर्वात जास्त प्रभावीत झाले.

3.कमकुवत जागतिक संकेतांमुळे गुंतवणूकदारांना नफा मिळविण्यास प्रवृत्त केले आहे. जपानच्या निक्केई आणि कोरियाच्या कोस्पीसह आशियातील प्रमुख बाजारपेठांमध्ये घसरण झाली.

सेन्सेक्स कंपन्यांमध्ये अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी, एनटीपीसी, महिंद्रा अँड महिंद्रा आणि अॅक्सिस बँक हे समभाग घसरणीत होते. दुसरीकडे, इंडसइंड बँक, सन फार्मा, अदानी पोर्ट्स आणि एशियन पेंट्स यांचे समभाग वधारले.

स्मॉलकॅप-मिडकॅपची कामगिरी

प्रमुख निर्देशांकांपेक्षा चांगली कामगिरी करत, निफ्टी स्मॉलकॅप 100 मध्ये 0.09 टक्क्यांनी आणि मिडकॅप 100 मध्ये 0.08 टक्क्यांनी घसरण झाली.  निफ्टी ऑटो, आयटी, फायनान्शियल सर्व्हिसेस, ऑइल अँड गॅस आणि एफएमसीजीमध्ये 0.5 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. निफ्टी एनर्जी, मीडिया, मेटल्स, फार्मा, रिअल्टी आणि कंझ्युमर ड्युरेबल्समध्ये वाढ नोंदवण्यात आली.

Advertisement
Tags :

.