महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दुसऱ्या सत्रात बाजार चढउतारासह बंद

06:26 AM Jun 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 33 टक्क्यांनी प्रभावीत तर निफ्टी 5 अंकांनी तेजीत

Advertisement

मुंबई :

Advertisement

चालू आठवड्यातील भारतीय भांडवली बाजारात दुसऱ्या सत्रात मंगळवारी भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढउताराचे वातावरण राहिले होते. यामध्ये मागील काही दिवसांपासून लोकसभा निवडणूक व त्याचा निकाल यामुळे काहीसे बाजारात अस्थिरतेचे वातावरण होते.

मात्र आता केंद्रात एनडीएने आपले स्थिर सरकार स्थापन केले आहे. याचा सकारात्मक परिणाम म्हणजे गुंतवणूकदार आपली नव्याने रणनीती आखण्याची योजना आखत आहेत. यामुळे येत्या काळात बाजारात स्थिरतेचे वातावरण निर्माण होणार असल्याचे काही अभ्यासकांचे मत आहे.

मंगळवारच्या सत्रात भारतीय बाजारात चढउतार राहिला आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर गुंतवणूकदार आता अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरासंबंधीत होणाऱ्या निर्णयावर नजर लावून बसले आहेत. यामुळे बाजारात दबाव व दोलायमान स्थिती निर्माण झाली होती. मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 33.49 अंकांनी घसरुन निर्देशांक 76,456.59 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 5.65 अंकांनी हलकीशी तेजी राहिल्यानंतर निर्देशांक 23,264.85 वर बंद झाला आहे.

सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये मंगळवारी लार्सन अॅण्ड टुब्रोचे समभाग हे सर्वाधिक 1.64 टक्क्यांनी तेजीत राहिले. यासह टाटा मोर्ट्स, मारुती सुझुकी, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा, एनटीपीसी, एचसीएल टेक, बजाज फायनान्स, स्टेट बँक, एचडीएफसी बँक यांचे समभाग हे वधारुन बंद झाले.

अन्य कंपन्यांमध्ये कोटक महिंद्राचे समभाग हे 1.44 टक्क्यांनी सर्वाधिक घसरणीत राहिले. यासह एशियन पेन्ट्स, आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, सनफार्मा, अॅक्सिस बँक यांचे समभाग हे प्रभावीत झाले.

मुख्य क्षेत्रांमध्ये चमक

बाजारात 13 मुख्य क्षेत्रांमधील सात क्षेत्रे ही तेजीत राहिली आहेत. यामध्ये तेल व गॅस निर्देशांक 1.33 टक्क्यांनी मजबूतपणे तेजीत राहिले होते. अन्य क्षेत्रांनीही समाधानकारक कामगिरी केली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article