महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सोमवारी अल्पशा घसरणीसोबत बाजार बंद

06:48 AM Jul 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 36 अंकांनी घसरणीत : बँकिंग, धातू क्षेत्रात दबाव

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

भारतीय शेअरबाजारात सोमवारी काहीशी घसरण पाहायला मिळाली आहे. एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग सोमवारी खरेदी करण्यामध्ये गुंतवणूकदारांनी रस दाखवला आहे.

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 36 अंकांनी किंवा 0.05 टक्के इतका घसरत 79,960 अंकांवर बंद झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 3 अंकांनी किंवा 0.01 टक्के घसरत 24,320 अंकांवर बंद झाला. निफ्टी निर्देशांकात सोमवारी ओएनजीसीचे समभाग सर्वाधिक 3.80 टक्के वाढत बंद झाले होते. आयटीसी, एचडीएफसी लाइफ यांचे समभागही 2 टक्के इतके वाढले होते. एचयुएलचा समभागसुद्धा 1.40 टक्के वाढत व्यवहार करत होता. तर दुसरीकडे घड्याळ व ज्वेलरी क्षेत्रात कार्यरत टायटन कंपनीचे समभाग 3.40 टक्के इतके घसरणीत होते. डिव्हीस लॅब्ज, बीपीसीएल, श्रीराम फायनान्स यांचेही समभाग सोमवारी नुकसानीत होते. सोमवारी गुंतवणूकदारांनी एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये खरेदी केली होती. आयटी क्षेत्रातही खरेदी दिसून आली पण बँकिंग आणि ऑटो क्षेत्रात मात्र विक्रीवर जोर दिसला होता.

निफ्टीची सुरुवात 23329 अंकांच्या स्तरावर सुरु झाली आणि दुपारी 12 च्या सुमारास घसरणीनंतर निफ्टीचा स्तर 24,241 पर्यंत खाली आला. पण खरेदीदार नंतर पुन्हा कार्यरत झाल्याने निफ्टीने 24300 चा स्तर गाठण्यात यश मिळवलं. सोमवारी दिवसभरात बाजारात जवळपास सपाटच व्यवहार झाल्याचे दिसून आले. बाजारात नेस्ले आणि टाटा मोटर्सचे समभाग तेजीत होते. अदानी पोर्टस्, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील यांचे समभाग मात्र दबावात कार्यरत होते. सकाळी 30 समभागांचा सेन्सेक्स 81 अंकांच्या घसरणीसह 79915 अंकांवर खुला झाला होता. सेन्सेक्समधील 15 समभाग घसरणीसह तर 15 तेजीसह बंद झाले. बँकिंग आणि धातू क्षेत्राची कामगिरी कमकुवत दिसून आली.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article