For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुसऱ्या सत्रात बाजार अल्पशा घसरणीसह बंद

06:39 AM Apr 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
दुसऱ्या सत्रात बाजार अल्पशा घसरणीसह बंद
Advertisement

सेन्सेक्स 110.64 तर निफ्टी 8.70 अंकांनी नुकसानीत : अदानी पॉवरला लागले अप्पर सर्किट

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतीय भांडवली बाजारात नवीन आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रात मंगळवारी बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक हे प्रभावीत होत बंद झाले आहेत. यामध्ये नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सोमवारी मात्र बाजारात मजबूत तेजीची नेंद राहिली होती.

Advertisement

दिवसभरात बाजारात चढउताराचे सत्र राहिले होते. यामुळे दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 110.64 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 73,903.91 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 8.70 अंकांनी घसरुन निर्देशांक 22,453.30 वर बंद झाला आहे.

सेन्सेक्समधील 30 समभागांमधील 15 समभाग हे प्रभावीत राहीले तर 15 वधारुन बंद झाले. यामध्ये आयटी क्षेत्रातील समभाग हे सर्वाधिक नुकसानीत राहिले आहेत. धातू आणि वाहन क्षेत्रातील समभागांमध्ये खरेदीचा कल राहिला होता.

शेअर बाजारातील निर्देशांकांमध्ये निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉलकॅप, निफ्टी वाहन आणि निफ्टी एफएमसीजी हे वधारुन बंद झाले. तर निफ्टीमधील बँक, आर्थिक क्षेत्र हे मात्र प्रभावीत राहिले आहेत.

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने मंगळवारी बाजारात टाटा कंझ्युमर, महिंद्रा, बजाज ऑटो, बीपीसीएल, अदानी पोर्ट्स, डिव्हीज लॅब आणि नेस्ले इंडियाचे समभाग हे वधारुन बंद झाले आहेत. यासोबतच हिरोमोटो कॉर्प, कोटक बँक, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, इन्फोसिस आणि टीसीएस यांचे समभाग हे मात्र घसरणीत राहिले होते.

गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देणाऱ्या कंपन्यांची स्थिती पाहिल्यास यामध्ये हिंदुस्थान झिंक, ओएनजीसी, एनटीपीसी आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग हे तेजीत राहिले होते. यासोबतच अॅक्सिस बँक, टीसीएस, विप्रो, इन्फोसिस आणि एचसीएल टेक यासारख्या कंपन्यांची घसरण राहिली आहे.

Advertisement
Tags :

.