नफा वसुलीमुळे बाजार घसरणीसह बंद
नवा विक्रम कायम ठेवण्यात शेअर बाजाराला अपयश
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यातील शेवटच्या दिवसाच्या सत्रात शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक नफा वसुलीमुळे घसरणीसह बंद झाले आहेत. यामध्ये बाजार बंद होण्याच्या अगोदर त्याने नवा विक्रम प्राप्त केला होता, मात्र तो कायम ठेवण्यात बाजाराला अपयश आल्याचे दिसून आले.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 264.27 अंकांनी घसरुन निर्देशांक 0.31 टक्क्यांसोबत 85,571.85 वर बंद झाला आहे. दिवसभरात सेन्सेक्स 142.12 अंकांसोबत मजबूत होत 85,978.25 चा नवा विक्रम प्राप्त केला मात्र कायम राहिला नाही. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 37.10 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 0.14 टक्क्यांसोबत 26,178.95 वर बंद झाला आहे. दिवसभराच्या कामगिरी दरम्यान निफ्टी 61.3 अंकांसोबत 26,277.35 चा नवा उच्चांक प्राप्त केला होता.
मुख्य कंपन्यांमधील सेन्सेक्सच्या 30 समभागांमधील 15 समभाग हे वधारले आहेत. यामध्ये सनफार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, टायटन, एचसीएल टेक आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग पहिल्या पाच मध्ये तेजीत राहिले. यासह एशियन पेन्ट्स, एनटीपीसी, इंडसइंड बँक, टाटा स्टील, मारुती सुझुकी, टीसीएस, इन्फोसिस, स्टेट बँक, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा आणि आयटीसी यांचे समभाग नफा कमाईत राहिले.
अन्य कंपन्यामध्ये सेन्सेक्समधील 30 समभागांमधील 15 समभाग नुकसानीत राहिले आहेत. यामध्ये पॉवरग्रिड कॉर्प, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांचे समभाग सर्वाधिक नुकसानीत राहिले. यासह लार्सन अॅण्ड टुब्रो, अदानी पोर्ट,अल्ट्राटेक सिमेंट, हिंदुस्थान युनिलिव्हर, जेएसडब्लू स्टील, अॅक्सिस बँक, बजाज फायनान्स, नेस्ले इंडाया, टाटा मोटर्स आणि टेक महिंद्रा यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले.
जागतिक बाजारांची स्थिती
आशियातील बाजारांमध्ये टोकीओ, शांघाय आणि हाँगकाँग यांचे निर्देशांक वधारले आहेत. तर सियोल प्रभावीत होत बंद झाला. युरोपीयन बाजाराची कामगिरी तेजीत राहिली होती. अमेरिकन बाजार गुरुवारी वधारुन बंद झाला आहे.