कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बाजारात अंतिम सत्रही घसरणीसह बंद

06:40 AM Jan 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 241 तर निफ्टी 95 अंकांनी नुकसानीत 

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारात पुन्हा घसरणीचे सत्र राहिले. यामध्ये प्रामुख्याने जागतिक बाजारपेठेत संमिश्र स्थितीचाही परिणाम काही प्रमाणात राहिल्याचे दिसून आले. आयटी क्षेत्रातील समभागांमध्ये तेजीचा कल राहिला असला तरी देशांतर्गत समभागांनी सलग तिसऱ्या सत्रात घसरणीचा प्रवास पकडला.

तिसऱ्या तिमाहीतील मंदावलेल्या कॉर्पोरेट निकालांची भीती आणि अमेरिकेतील व्याजदरांमध्ये वारंवार कपात होण्याची शक्यता यामुळे बाजारातील कामगिरीवर नकारात्मक परिणाम झाला. याशिवाय, विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे या आठवड्यात बाजारावर दबाव आहे. बीएसई सेन्सेक्स 77,682 अंकांवर खुला झाला. ट्रेडिंग दरम्यान तो 600 पेक्षा जास्त अंकांनी घसरला होता. अंतिम क्षणी मात्र सेन्सेक्स 241.30 अंकांनी  प्रभावीत होत  0.31 टक्क्यांसह निर्देशांक 77,378.91 वर बंद झाला. तसेच, राष्ट्रीय शेअर बाजारचा निफ्टी 50 देखील अंतिमक्षणी 95.00 टक्क्यांच्या नुकसानीसह निर्देशांक 23,431.50 वर बंद झाला.

घसरणीची कारणे काय?

देशांतर्गत कंपन्यांच्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालांबद्दलच्या चिंतेमुळे भारतीय शेअर बाजार शुक्रवारी घसरणीसह बंद झाला. आठवड्याच्या सुरुवातीला जाहीर झालेल्या आकडेवारीत अर्थव्यवस्थेतील वाढीचा वेग कमी होण्याचे संकेत मिळाल्यानंतर कॉर्पोरेट उत्पन्नात घट होण्याची चिंता अधिक तीव्र झाली आहे. याशिवाय, परदेशी गुंतवणूकदारांकडून सतत विक्री केल्यानेही आगीत इंधन भरले गेले, ज्यामुळे बाजारात गोंधळ निर्माण झाला. दोन्ही निर्देशांकांनी आठवड्याचा शेवट घसरणीने केला, ज्यामुळे वाढीचा सिलसिला खंडित झाला. या आठवड्यात दोन्ही निर्देशांक सुमारे 2.4 टक्क्यांनी घसरले. यामुळे दोन आठवड्यांच्या वाढीचा प्रवास खंडित झाला. 6 10 जानेवारीदरम्यान सेन्सेक्स दबावात राहिला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article