For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

8 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 2.10 लाख कोटींनी वाढले

06:43 AM Jul 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
8 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 2 10 लाख कोटींनी वाढले
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

आघाडीवरच्या 10 पैकी 8 कंपन्यांच्या बाजार भांडवलात मागच्या आठवड्यात 2 लाख 10 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या भांडवल मूल्यात सर्वाधिक वाढ झाली आहे.

मागच्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 85 अंक वाढला होता, सोबत 81,587 अंकांची सर्वोच्च पातळीही गाठली होती. मागच्या आठवड्यात बुधवारी शेअरबाजाराला मोहरमची सुट्टीहोती.

Advertisement

यांचे मूल्य वाढले

टीसीएसचे बाजार भांडवल मूल्य 42,639 कोटींनी वाढत 15,56,772 कोटी रुपयांवर पोहचले होते. एलआयसीचे भांडवल 36,748 कोटींनी वाढत 7,01,695 कोटी रुपयांवर पोहचले होते. इन्फोसिसचे बाजार भांडवल मूल्य 33,569 कोटींनी वाढत 7,44,396 कोटी रुपयांवर पोहचले होते. स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजार भांडवल 26,372 कोटींनी वाढत 7,93,576 कोटी रुपयांवर राहिले होते. हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजार भांडवल 24,494 कोटींनी वाढून 6,40,651 कोटी रुपयांवर पोहचले. आयटीसीचे भांडवल मूल्य 19,420 कोटींसोबत वाढत 5,92,679 कोटींवर, भारती एअरटेलचे 16,223 कोटींनी वाढत 8,31,928 कोटींवर आणि आयसीआयसीआय बँकेचे 10,863 कोटींनी वाढत 8,78,531 कोटी रुपयांवर पोहचले होते.

यांचे मूल्य घटले

रिलायन्स इंडस्ट्रिजचे बाजार भांडवल 56,799 कोटींनी घसरत 21,03,829 कोटी रुपयांवर राहिले होते. याचसोबत एचडीएफसी बँकेचे भांडवल मूल्यही घसरले होते, जे 13,124 कोटींनी घटत 12,22,701 कोटी रुपयांवर राहिले.

Advertisement
Tags :

.