सलग तिसऱ्या सत्रातही बाजाराची तेजी कायम
सेन्सेक्स 63 तर निफ्टी 28 अंकांनी तेजीत: रिलायन्स समभागांची चमकवृत्तसंस्था
मुंबई : भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील सलग तिसऱ्या दिवशी गुरुवारी आशियाई बाजारामधील तेजीमुळे बीएसई सेन्सेक्स 63 अंकांनी वधारुन बंद झाला आहे. यामध्ये गुंतवणूकदारांनी आयटी क्षेत्रातील पहिल्या दोन कंपन्यांमध्ये टीसीएस आणि इन्फोसिस यांचे तिमाही अहवाल सादर होण्याच्या अगोदरच सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले. कारण या दोन कंपन्यांचे तिमाही अहवाल गुरुवारी उशिरा सादर होणार होते. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 63.47 अंकांनी वधारुन निर्देशांक 71,721.18 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 28.50 अंकांच्या हलक्या तेजीसह निर्देशांक 21,647.20 वर बंद झाला आहे. निफ्टीचा गुरुवारी कल पाहिल्यास यामध्ये निफ्टीचे 50 मधील 25 कंपन्यांचे समभाग हे वधारुन बंद झाले, तर 25 समभाग हे नुकसानीसोबत बंद झाले.
सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग हे सर्वाधिक म्हणजे 2.58 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. यासोबतच अल्ट्राटेक सिमेंट, अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, पॉवरग्रिड कॉर्प, टाटा मोर्ट्स, टेक महिंद्रा आणि टाटा कंसल्टेंसी सर्व्हिसेसचे समभाग हे नफा कमाईसह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांच्या स्थिती बाबत पाहिल्यास यात इन्फोसिससह हिंदुस्थान युनिलिव्हर, विप्रो, लार्सन अॅण्ड टुब्रो आणि नेस्ले यांचे समभाग मात्र नुकसानीत बंद झाले आहेत. जागतिक बाजारांची कामगिरी पाहिल्यास यामध्ये गुरुवारी आशिया बाजारामध्ये टोकीओ, शांघाय आणि हाँगकाँग हे तेजीसह बंद झाले. तर सियोल हा घसरणीत राहिला. युरोपीयन बाजार वधारुन बंद झाला. स्टॉक एक्सचेंजच्या डाटानुसार विदेशी संस्थांच्या गुंतवणूकदारांनी बुधवारी जवळपास 1,721.35 कोटी रुपयांच्या इक्विटीची विक्री केली आहे. आज सप्ताहामधील अंतिम सत्र असल्यामुळे बाजार शुक्रवारी कोणती दिशा निश्चित करणार आहे. हे पहावे लागणार आहे. यामुळे जागतिक पातळीवरील विविध बाजारांची कामगिरी व आंतरराष्ट्रीयसह देशातील स्थितीवर बाजाराचा कल ठरणार असल्याचे शेअर बाजार अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- हिरो मोटोकॉर्प 4342
- बजाज ऑटो 7298
- रिलायन्स 2719
- अॅक्सिस बँक 1125
- बीपीसीएल 458
- अल्ट्राटेक सिमेंट 9920
- आयशर मोटर्स 3888
- अपोलो हॉस्पिटल 5869
- पॉवरग्रिड कॉर्प 241
- इंडसइंड बँक 1657
- ब्रिटानिया 5136
- टाटा मोटर्स 815
- ग्रासिम 2083
- टेक महिंद्रा 1249
- युपीएल 562
- टीसीएस 3735
- कोल इंडिया 384
- टाटा स्टील 134
- एलटीआय माइंट्री 5959
- कोटक महिंद्रा 1822
- डिव्हीस लॅब्ज 3905
- एशियन पेंटस् 3288
- भारती एअरटेल 1062
- मारुती सुझुकी 10011
समभाग घसरलेल्या कंपन्या
- इन्फोसिस 1494
- डॉ. रे•िज लॅब्ज 5692
- एसबीआय लाइफ 1427
- एचयुएल 2536
- विप्रो 448
- लार्सन टुब्रो 3504
- अदानी पोर्टस 1202
- जेएसडब्ल्यू स्टील 822
- नेस्ले 2557
- सन फार्मा 1316
- अदानी एंटरप्रायझेस 3080
- हिंडाल्को 576
- एचसीएल टेक 1484
- टायटन 3698
- एचडीएफसी बँक 1649
- सिप्ला 1325
- महिंद्रा आणि महिंद्रा 1628