संगमरमराच्या मूर्तीला 27 कोटीची किंमत
कारण चकित करणारे
तुम्ही एकापेक्षा एक महाग संगमरमर पाहिले असतील. त्यांच्याविषयी ऐकले असेल. परंतु स्कॉटलंडमध्ये एक छोटासा संगमरमराचा तुकडा 27 कोटी रुपयांमध्ये विकला जाणार आहे. हा तुकडा केवळ 6 डॉलर्स म्हणजेच 500 रुपयांमध्ये खरेदी करण्यात आला होता आणि कित्येक वर्षांपर्यंत याचा वापर एका पार्कमध्ये दरवाजाला रोखण्यासाठी डोअरस्टेपच्या स्वरुपात करण्यात आला होता. परंतु आता याची किंमत एका कारणामुळे प्रचंड वाढली आहे.
ही एक संगमरमराची एक छोटीशी मूर्ती असून जिला एका घरातून प्राप्त करण्यात आले होते. नंतर ती एका पार्कमध्ये डोअर स्टेपच्या कामाकरता वापरण्यात आली होती. काही काळानंतर ही मूर्ती 18 व्या शतकाच्या प्रारंभी फ्रेंच मूर्तिकार अॅडम बुचार्डन यांनी निर्माण केल्याचे कळले होते. तत्कालीन प्रसिद्ध जमीनदार आणि राजनीतिज्ञ जॉन गार्डन यांची ही मूर्ती असल्याचे कळल्यावर याच्या प्रसिद्धीला मोठे प्रमाण मिळाले.
या मूर्तीवरून खटलाही चालला, ज्यात आता न्यायालयाने विक्रीसाठी मंजुरी दिली आहे. स्कॉटिश हायलँड्स कौन्सिलनुसार या मूर्तीची लिलावातील किंमत 3.2 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 27 कोटी रुपयांपेक्षा अधिक राहू शकते. एका विदेशी खरेदीदाराने लिलाव कंपनी सोथबीशी संपर्क साधल्यावर आणि त्याकरता 2.5 दशलक्ष पाउंडहून अधिक रक्कम देण्याची ऑफर दिल्यावर या मूर्तीविषयी वण्ले होते. अधिकाऱ्यांना या मूर्तीचे महत्त्व समजल्यावर त्यांनी ती लपवून ठेवली होती. परंतु आता ती विकण्याची तयारी केली जात आहे.
अशाच प्रकारचे एक प्रकरण 2018 मध्ये समोर आले होते. तेव्हा सेंट्रल मिशिगन युनिव्हर्सिटीत एक दगड मिळाला होता, ज्याला सामान्य दगडाचा तुकडा समजून डोअरस्टेपच्या स्वपरात वापरले जात होते. दशकांपर्यंत त्याविषयी कुणालाच माहिती नव्हती. परंतु हे एक खास प्रकारचे उल्कापिंड असल्याचे कळले होते. यानंतर याची किंमत 75 हजार डॉलर्स म्हणजेच 60 लाख रुपये ठरली होती.