For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एका बेटाचा नकाशा बदलला

06:53 AM Jun 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
एका बेटाचा नकाशा बदलला
This photo taken on June 18, 2026, shows an aerial photo of the coastal uplift following an earthquake along the Pangyan Marine Sanctuary in Glan, Sarangani. A powerful earthquake that killed at least 61 people in the Philippines raised the seabed by as much as two metres (6.6 feet), exposing coral and harming marine life, the environment department said on June 14. (Photo by Ferdinandh Cabrera / AFP)
Advertisement

8 जून रोजी फिलिपाईन्सच्या मिंडानावोमध्ये सारंगानी बेटाच्या दक्षिणेस समुद्रात 7.8 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला होता. आता या भूकंपामुळे तेथील भूगोल नेहमीसाठी बदलला आहे. या भूकंपानंतर सारंगानी आणि आसपासच्या किनारी भागांमधून एक अत्यंत हैराण करणारे चित्र समोर आले आहे. समुद्राचे पाणी अचानक मागे हटले आणि जो हिस्सा पूर्वी पाण्यात बुडालेला होता, तो कोरड्या जमिनीच्य ा स्वरुपात बाहेर आला आहे. विज्ञानाच्या भाषेत याला कोस्टल अपलिफ्ट म्हटल जाते. वैज्ञानिक आता बदलामागे भूगर्भीय कारणे जाणून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत, तर दुसरीकडे सोशल मीडियावर काही भ्रामक माहिती पसरल्याने स्थानिक लोकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. समुद्र किनारा मागे हटणे आणि जमीन वर आल्याचे पाहून किनारी भागांमध्ये राहणाऱ्या स्थानिक लोकांच्या मनात समुद्राचे पाणी मागे हटण्याचा संकेत अत्यंत लवकर भयानक त्सुनामीच्या स्वरुपात परतण्याचा आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.

Advertisement

त्सुनामी येण्यापूर्वी समुद्राचे पाणी वेगाने मागे हटू लागते असे सर्वसाधारणपणे लोक जाणतात. याचमुळे लोकांची ही भीती स्वाभाविक होती. परंतु हा काही त्सुनामीचा संकेत नाही, तर पृथ्वीमध्ये टेक्टोनिक प्लेटच्या हालचालीचा एक स्थायी परिणाम असल्याची पुष्टी वैज्ञानिकांनी दिली आहे.

Advertisement

थ्रस्ट फॉल्टचा खेळ

पृथ्वीचे वरील आच्छादन म्हणजेच क्रूस्ट पूर्णपणे एक तुकडा नाही, तर हा अनेक मोठ्या आणि छोट्या प्लेट्सनी मिळूनतयार झाला असून त्याची उंची मापण्याचे शास्त्र आहे. जुन्या काळात भूकंपापूर्वी आणि भूकंपानंतर जमिनीच्या उंचीची पारंपरिक उपकरणांद्वारे तुलना केली जात होती. ज्यातून जमिनी किती उंचावली हे कळत होते. परंतु अंतराळातील उपग्रहांमुळे हे काम अत्यंत अचूक अन् सोपे ठरले आहे. याकरता वैज्ञानिक ‘इंटरफेरोमेट्री“ तंत्रज्ञानाचा वापर करतात. ज्यात एक उपग्रह वेगवेगळ्या वेळेत पृथ्वीच्या एकाच निश्चित क्षेत्राची छायाचित्रे टिपतो. सारंगानी बेटाच्या दक्षिण किनाऱ्यावर जमीन उंचावल्याचे प्रारंभिक इंटरफेरोमेट्रिक विश्लेषणातून स्पष्ट झाले आहे. सारंगानी प्रांताचे ग्लान शहर आाि दावो ऑक्सिडेंटलच्या जोस अबाद सँटोस शहरात सर्वाधिक वरच्या दिशेने होणारी हालचाल नोंद झाली आहे. यानंतर वैज्ञानिकांनी पँग्यान, बूरियास, बिग मार्गस, स्मॉल मार्गस, बतुलाकी आणि कामालिएन यासारख्या गावांचे निरीक्षण केले, तेव्हा उपग्रहीय दाव्यांची पूर्णपणे पुष्टी झाली आहे. या गावांमध्sय समुद्र किनाऱ्यावर लाटा धडकत होत्या, त्या आता गायब झाल्या आहेत. तर कधीकाळी पाण्याखाली राहणारे खडक आता पूर्णपणे दिसून येत आहेत.

Advertisement

.