महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले

06:10 AM May 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सह्याद्रीनगर परिसरातील घटनेने भीतीचे वातावरण

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

सह्याद्रीनगर परिसरातील एका महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र भामट्यांनी पळविले आहे. शनिवारी सायंकाळी नालंदा इंटरनॅशनल स्कूलजवळ ही घटना घडली असून रात्री एपीएमसी पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

अंजना परशुराम आलोजी (वय 58) रा. सह्याद्रीनगर यांनी शनिवारी रात्री एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. नेहमीप्रमाणे त्या जनावरे चारण्यासाठी घेऊन गेल्या होत्या. नालंदा स्कूलजवळ असताना सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोघा तरुणांपैकी एकाने अंजना यांच्याकडे पत्ता विचारला.

त्यांच्यापासून जवळच जाऊन भामट्याने कोणाशी तरी फोनवरून संभाषण केले. तो मराठीतून बोलत होता. तोपर्यंत मोटारसायकल चालवणारा भामटा थोड्या अंतरावर थांबला होता. मोटारसायकल जवळ येताच आपल्या जनावरांकडे पहात बसलेल्या अंजना यांच्या गळ्यातील मंगळसूत्राला भामट्याने हात घातला. हिसडा मारून ते पळविले.

हा प्रकार लक्षात येताच अंजना यांनी आरडाओरड केली. शेजारचे नागरिक त्यांच्या मदतीसाठी धावून आले. काही जणांनी भामट्यांचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला. दोन्ही भामट्यांनी आपल्या तोंडावर मास्क बांधले होते. कंग्राळीच्या दिशेने मोटारसायकलवरून त्यांनी पलायन केले. घटनेची माहिती समजताच एपीएमसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक त्रिवेणी नाटीकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम हाती घेतले.

शनिवारी रात्रीपर्यंत मंगळसूत्र पळविणाऱ्या भामट्यांबद्दल कसलीच माहिती पोलिसांना नव्हती. या गरीब महिलेने अलीकडेच हे मंगळसूत्र करून घेतले होते. मात्र, भामट्यांनी ते हिसकावून नेले आहे. चेनस्नॅचिंगच्या या घटनेनंतर परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एपीएमसीचे पोलीस निरीक्षक खाजा हुसेन पुढील तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article