12 पत्नी अन 102 मुले असणारा अवलिया
भारतासह अनेक देश अधिक लोकसंख्येच्या समस्येला तेंड देत आहेत. अनेक देशांमध्ये तर कमी प्रजननदरामुळे समस्या निर्माण झाली आहे. परंतु युगांडामध्ये एका इसमाने पूर्ण जगाला चकित केले आहे. युगांडाचा रहिवासी मूसा हसहया कसेरा स्वत:च्या मोठ्या परिवारामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. मूसाने एकूण 12 विवाह केले आहेत.
12 पत्नींपासून मूसाला एकूण 102 मुले झाली आहेत. मूसा पूर्व युगांडाच्या मुकीजा गावाचा रहिवासी आहे. मूसाला एकूण 578 नातवंडं आहेत. या मुलांची संख्या अधिक झाल्याने त्यांची नावे आठवणीत ठेवणे मूसासाठी अवघड ठरले आहे. याचमुळे तो एक रजिस्टर बाळगत असुन यात त्याच्या मुलांची नावे लिहिण्यात आली आहेत.
मूसा आता 70 वर्षांचा झाला असू इतक्या मोठ्या कुटुंबाचा संसार चालविणे त्याला अवघड ठरले आहे. मर्यादित साधनसामग्रीमुळे भोजन आणि इतर गजा पूर्ण करणे सर्वात मोठी समस्या ठरली आहे. मूसाचा पहिला विवाह 1972 मध्ये झाला होता, तेव्हा तो केवळ 17 वर्षांचा होता, त्यानंतर त्याने 12 विवाह केले आहेत. मोठ्या परिवाराचे पोट कसे भरणार याचा कधी विचारच त्याने केला नाही.
इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला असून यात मूसाचा परिवार दाखविण्यात आला आहे. या व्हिडिओला केवळ एका दिवसात 8 लाखाहून अधिक लाइक्स आणि 20 दशलक्ष ह्यूज मिळाल्या आहेत. अनेक लोकांनी या पोस्टवर कॉमेंट देखील केली आहे.