देशातील दूरसंचार क्षेत्रातील मुख्य कंपन्या एआयमध्ये गुंतवणूक करणार
डेटा सेंटरमध्ये तब्बल 1 लाख कोटींपेक्षा अधिकची गुंतवणूक प्राप्त होण्याची अपेक्षा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतातील दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपन्या एआयमध्ये मोठी गुंतवणूक करणार करणार आहेत. यामध्ये डेटा सेंटरमध्ये 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करणार असल्याची माहिती आहे. भारतातील दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपन्या आता त्यांचे नेटवर्क वाढवण्याऐवजी एआय डेटा सेंटरमध्ये कोट्यावधी रुपये गुंतवण्याची तयारी करत आहेत. प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेची मागणी वाढत आहे. म्हणून आता भारतातील दूरसंचार ऑपरेटर पुढील दोन ते तीन वर्षांत एआय क्षेत्रात एक मजबूत स्थान निर्माण करू इच्छितात. यासाठी एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक योजना आखली जात आहे.
काय प्रकरण आहे?
रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल सारख्या भारतीय दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपन्या एआय डेटा सेंटर्ससह त्यांच्या क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरला बळकट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची तयारी करत आहेत. त्यांच्या योजनेअंतर्गत पुढील 2 ते 3 वर्षांत कंपन्या एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपये खर्च करतील. याचा अर्थ कंपन्यांचे मुख्य लक्ष त्यांच्या 5जी डेटा नेटवर्कचा विस्तार करण्याऐवजी कृत्रिम बुद्धिमत्तेशी जोडलेल्या डेटा सेंटर्सना बळकट करण्याकडे वळले आहे.