For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाविकास आघाडीचेच सरकार सत्तेत येणार

05:04 PM Nov 18, 2024 IST | Radhika Patil
महाविकास आघाडीचेच सरकार सत्तेत येणार
The Mahavikas Aghadi government will come to power.
Advertisement

कोल्हापूर :   

Advertisement

महाराष्ट्रातील महायुती सरकारचे इंजिन फक्त धूर सोडते, कोणतेही विकास काम करत नाही, महागाई वाढवण्राया व जातीचे राजकारण करण्राया या सरकारचा येत्या निवडणुकीत पराभव करून महाविकास आघाडीचे पारदर्शी सरकार स्थापन करण्यासाठी तुमचे एक मत राज्याचे भविष्य बदलू शकते, असे प्रतिपादन राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केले. ते कसबा बावड्यातील भाजी मंडई येथील कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रीय काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारार्थ बोलत होते. यावेळी खासदार शाहू छत्रपती व डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार सचिन पायलट म्हणाले, गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत 400 पार म्हणण्राया महायुतीचा गर्व उतरण्याचे काम महाविकास आघाडीने केले आहे. कोणताही धर्म चांगलाच असतो. व्यक्ती चांगली किंवा वाईट असते. पण बटोगे तो कटोगे चा नारा देण्राया महायुती सरकारने जातीचे राजकारण करून एकमेकांत भांडणे लावली आहेत. अशा महायुती सरकार ला त्यांची जागा दाखवून द्यायची असेल तर आपले बहुमूल्य मत उत्तरचे उमेदवार राजेश लाटकर यांना देऊन महाविकास आघाडीचे पारदर्शी सरकार स्थापन करूया.

Advertisement

विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील म्हणाले, कसबा बावडा व लाईन बझार परिसरातील नागरिक नेहमीच माझ्या पाठीशी ठामपणे उभे असतात. माझ्या रक्तवाहिनीतील रक्तातील प्रत्येक अंश कसबा बावड्यातला आहे. माझी राजकारणातील मूर्ती बावडेकरांनीच बनवली आहे. महिलांचा अपमान करण्राया शेतक्रयांवर अन्याय करण्राया या महायुती सरकारला या निवडणुकीत धडा शिकवण्याची वेळ आली असून उत्तरचे उमेदवार राजेश लाटकर यांना कसबा बावड्यातून मताधिक्य द्यावे.

केसाने गळा कापणारी महाडिक कंपनी
विधानसभेच्या या रणधुमाळीत विरोधकांकडून मला चारी बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न होत आहे. माझ्यावर वैयक्तिक टीकाटिपणी करत आहेत. पुत्रप्रेमापोटी आपल्याच पाहुण्यांचा केसाने गळा कापणारी महाडिक कंपनीने माझ्यावर कितीही आरोप केले तरी मी तेवढ्याच ताकतीने पुढे जाण्याचे काम करणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांचे नाव न घेता आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

यावेळी खासदार शाहू छत्रपती, भारती पोवार, हर्षल सुर्वे, शिवसेनेचे राहुल माळी, अक्षय खोत, आनंदा करपे, कॉम्रेड सतिशचंद्र कांबळे, राष्ट्रवादी चे आर. के. पोवार यांनी मनोगत व्यक्त केले. सभेचे प्रास्ताविक व स्वागत माजी नगरसेवक मोहन सालपे यांनी केले.

यावेळी माजी नगरसेवक डॉ. संदिप नेजदार, हरीश चौगले, वंदना बुचडे, स्वाती यवलुजे, माधुरी लाड, जयसिंग ठाणेकर, श्रीराम सोसायटीचे सभापती संतोष पाटील, शिवसेनेचे राहुल माळी, विलास दाभोळकर, आम आदमी पार्टीचे संदिप देसाई, कॉम्रेड दिलीप पोवार, रघुनाथ कांबळे उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.