For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जगातील सर्वात ‘निम्न’ स्थान

06:49 AM Jul 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
जगातील सर्वात ‘निम्न’ स्थान
Advertisement

जगातले सर्वात उंच स्थान हे हिमालयातील एव्हरेस्ट पर्वत शिखर हे आहे. बहुतेकांना हे माहीत असते. तथापि, जगातील सर्वात निम्न किंवा खालचे स्थान कोणते आहे, ही माहिती फारच थोड्या जणांना असते, असे तज्ञांचे मत आहे. तसे पाहिल्यास जगात अनेक स्थाने अगदी खाली किंवा भूमीलगत आहेत. तथापि, मृत समुद्र हे स्थान सर्वात खालच मानले जाते. हा मृत समुद्र इस्रायल आणि जॉर्डन यांच्या मध्ये आहे. त्याचे पाणी इतके क्षारयुक्त किंवा खारट आहे, की त्यात मासे किंवा अन्य कोणतेही समुद्री प्राणी तसेच सागरी वनस्पती किंवा जीव जिवंत राहू शकत नाहीत. त्यामुळेच त्याला ‘मृत समुद्र’ किंवा डेड सी असे नाव पडले आहे. या समुद्रात माणूस किंवा कोणताही सजीव पडला तरी तो बुडत नाही. कारण क्षारांचे प्रमाण अधिक असल्याने या समुद्राच्या पाण्याची उद्धरण शक्ती इतर कोणत्याही गोड्या किंवा खाऱ्या पाण्यापेत्रा अधिक आहे. या सागराचे पाणी औषधी आहे, असेही मानले जाते. त्यामुळे या समुद्रात काही दिवस पोहल्यास अनेक प्रकारचे त्वचारोग नाहीसे होतात, अशीही समजूत आहे. याला सर्वात खालचे स्थान म्हटले जाते, कारण हा सागर समुद्रसपाटीच्या सर्वसाधारण पातळीपेक्षा 430 मीटर खाली आहे. त्यामुळे याला पृथ्वीवरचे सर्वात खालचे खुले स्थान मानले जाते.

Advertisement

या ‘मृत समुद्रा’ची अनेक वैशिष्ट्यो आहेत. या सागरावर अद्यापही संशोधन बरेचे संशोधक करत असून त्याची नवनवी रहस्ये या संशोधनातून उघड होत आहेत. हा समुद्र असला तरी तो एखाद्या सरोवरासारखा चारी बाजूंनी बंदिस्त आहे. इस्रायलने अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसीत करुन या समुद्राचे अतिखारे पाणीही गोडे करुन त्या पाण्यावर आपल्या देशातील एक मृत नदीही जिवंत आणि वाहती केली आहे. या समुद्राची खोली अधिकतर 309 मीटर किंवा 997 फूट इतकी असून पृथीवरच्या खाऱ्या सरोवरांमधील ती सर्वाधिक असल्याचे मानले जाते.

Advertisement
Advertisement
Tags :

.