Ratnagiri News : खेडशी गणाच्या विकासाचा बुलंद आवाज: वैभव विठोबा पाटील! जनसेवेचा वारसा अन् धनुष्यबाणाची साथ!
खेडशी गणातून शिवसेनेचे वैभव पाटील यांची निवडणुकीत जोरदार मुसंडी
रत्नागिरी: पंचायत समिती खेडशी गणातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार वैभव विठोबा पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात जोरदार मुसंडी मारली आहे. राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गतिमान कार्यप्रणालीवर आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास ठेवून वैभव पाटील खेडशी गणाच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज झाले आहेत. शासनाच्या लोकोपयोगी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे आणि गणातील पायाभूत प्रश्न मार्गी लावणे, हाच त्यांचा मुख्य संकल्प आहे.
खेडशी आणि मिरजोळे भागातील ग्रामस्थांशी वैभव पाटील यांचे रक्ताचे नाते आहे. प्रचारादरम्यान त्यांना मिळणारा जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद त्यांच्या विजयाची साक्ष देत आहे. मतदारांशी संवाद साधताना ते भावूकपणे सांगतात की, "येथील जनता माझे कुटुंब आहे. जसे प्रेम माझे वडील माजी पंचायत समिती सदस्य कै. विठोबा पाटील आणि माजी सभापती विभांजली पाटील यांच्यावर आपण केले, तसेच आशीर्वाद या कुटुंबातील मुलावर कायम राहू द्या." गणातील शिवसेना पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी वैभव पाटील यांना भक्कम पाठिंबा दिला असून, 'धनुष्यबाण' या निशाणीवर मोहर उमटवून विकासाला विजयी करण्याचे आवाहन आता खेडशी गणातून होत आहे. वारसा जनसेवेचा आणि ध्यास विकासाचा घेऊन वैभव पाटील खेडशीच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहेत