मणेरी माऊली देवीचा लोटांगण जत्रोत्सव उद्या
दोडामार्ग – वार्ताहर
मणेरी येथील श्री कुलस्वामिनी माऊली देवीचा वार्षिक लोटांगण जत्रोत्सव मंगळवार दि. ३० डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. या जत्रोत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ९.०० वाजता श्री देवीची विधिवत पूजा, आरती व तीर्थप्रसाद होणार असून, ११.०० वाजता ओटी भरणे, नवस बोलणे व नवस फेडणे हे धार्मिक विधी पार पडणार आहेत. रात्री ९.०० वाजता लोटांगण विधी होणार असून,त्यानंतर रात्री १२.०० वाजता महाआरती संपन्न होईल.रात्री १२.३० वाजता प्रसिद्ध खानोलकर दशावतार कंपनीचा नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला असून,भाविकांसह रसिक प्रेक्षकांसाठी हा विशेष आकर्षणाचा कार्यक्रम ठरणार आहे.या जत्रोत्सवाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी सहकुटुंब, सहपरिवार व मित्रमंडळीसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देवी माऊली मंदिर पंचायतन समिती, मणेरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.लोटांगण घालावयाची इच्छा असलेल्या भाविकांनी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष श्री देवानंद नाईक यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.