लोकसभा निवडणूक पडघम वाजू लागले !
बुथ निहाय एजंटाची माहिती देण्याच्या निवडणूक विभागाच्या सूचना
सावंतवाडी । प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणूक विभागाकडूनही यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी बूथ निहाय एजंटची नियुक्ती करून त्यांचे नाव व मोबाईल नंबर देण्याच्या सूचना निवडणूक विभागातर्फे देण्यात आल्या आहेत. निवडणूक विभागातर्फे यापूर्वी मतदार नोंदणी करण्यात आली आहे. आता लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. फेब्रुवारी महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने तालुकानिहाय राजकीय पक्षांच्या बुथ निहाय एजंटांची माहिती मागितली आहे. या पक्षाने बुथ निहाय एजंटाची माहिती देण्याची सूचना निवडणूक विभागाने राजकीय पक्षांना केली आहे. यापूर्वी निवडणूक विभागातर्फे निवडणुकीपूर्वी अशा प्रकारची बुथ निहाय एजंटाची माहिती राजकीय पक्षांकडून मागवली नव्हती. परंतु ह्यावेळीच अशी माहिती मागवण्यात आली आहे.