महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ग्लोबल चेस लीगच्या दुसऱ्या मोसमासाठी खेळाडूंची यादी जाहीर

06:05 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
The list of players for the second season of the Global Chess League has been announced
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

ग्लोबल चेस लीगने (जीसीएल) लंडनमधील फ्रेंड्स हाऊस येथे 3 ते 12 ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या दुसऱ्या स्पर्धेसाठी दिग्गज पुऊष खेळाडूंनी भरलेली यादी जाहीर केली आहे. सदर लीग हा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ आणि टेक महिंद्रा यांचा संयुक्त उपक्रम आहे.

Advertisement

दुसऱ्या मोसमात मॅग्नस कार्लसन, हिकारू नाकामुरा आणि विश्वनाथन आनंद यांच्यासह जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेला अर्जुन इरिगेसी, जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेला नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह, जागतिक क्रमवारीत 12 व्या क्रमांकावर असलेला आर. प्रज्ञानंद आणि आठव्या क्रमांकावर असलेला वेई यी यांचा सहभाग राहणार आहे.

जीसीएलच्या निवेदनानुसार, पहिल्या स्पर्धेत स्पर्धावीर पुरस्कार मिळवणारा प्रज्ञानंद सुपरस्टार गटात स्पर्धा करेल. स्पर्धेला आणखी आकर्षक बनवताना विदित गुजराथी, जॅन-क्रिझिस्टोफ डुडा, रिचर्ड रॅपपोर्ट, शाखरियार मामेदयारोव्ह, तेमूर रदजाबोव्ह, अलेक्झांडर ग्रिशुक, परहम माघसूदलू आणि व्लादिस्लाव आर्टेमिएव्ह यांचा देखील सुपरस्टारच्या 12 खेळाडूंच्या यादीत सहभागी असेल.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article