"शेर नही रहा लेकीन छावा अभी भी जंगल में घुम रहा है"
छावा सिनेमाचा ट्रेलर लॉन्च
अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता यासारखी तगडी स्टारकास्ट
मुंबई
विकी कौशल याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत छावा सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. या सिनेमाच्या ट्रेलर ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. सिनेमाचे पिक्चरायझेशन, दमदार संवाद आणि कास्टींगमुळे सिनेमाची चर्चा जोरादार सुरू आहे. ट्रेलर लॉन्च झाल्यावर दोन तासातच १५ लाख व्ह्यूज मिळाले.
या चित्रपटात छत्रपती संभाजीराजेंची भूमिका विकी कौशिक साकारत आहे. तर येसूबाई भोसले यांची भूमिका रश्मिका मंदाना साकारत आहे. या सिनेमाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे औरंगजेबाची भूमिका अक्षय खन्ना करत आहे. यासोबतच सरसेनापती हंबीरराव मोहीते यांची भूमिका आशुतोष राणा साकारत आहे. या चित्रपटाती तगडी स्टारकास्ट पाहता सिनेमाची उत्सुकता अगदी शिगेला गेली आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळा लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. मिमी, जरा हटके जरा बचके, लुकाछुपी, तेरी बातोंमे ऐसा उलझा जिया यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. येत्या १४ फेब्रुवारी या सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.