For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडीत विजेचा खेळ खंडोबा ; नागरिक हैराण

05:54 PM Mar 26, 2026 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडीत विजेचा खेळ खंडोबा   नागरिक हैराण
Advertisement

दिवसातून 24 ते 25 वेळा जाते लाईट

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

अमेरिका , इस्राईल- इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात गॅस सोबतच पेट्रोल, डिझेलचाही तुटवडा भासू लागला आहे. त्याबरोबरच सावंतवाडीकर सध्या विजेच्या खेळाने त्रस्त झाले आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री ९ वाजेपर्यंत म्हणजे तब्बल १२ तासांमधून 24 ते 25 वेळा वीज येत -जात असल्याने नागरिक हैराण झाले आहेत .वीज तारांना झाडाच्या फांद्यांचे घर्षण होऊन विजेची समस्या निर्माण होते असा जावई शोध महावितरणने लावला होता . सावंतवाडी सारख्या शहरात वीज लाईनला झाडाच्या फांद्या लागून विज अधून मधून जात असेल तर वीज वितरणच्या कारभाराचा हा अजब नमुना आहे अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागली आहे. विजेचा लपंडाव सुरु असल्याने व्यापारी वर्ग तसेच थंड पेय दुकानदारांचे मोठे हाल होत असून एकीकडे गॅस, पेट्रोलचा तुटवडा आणि दुसरीकडे विजेचा लपंडाव यामुळे नागरिकांनी दाद मागायची कुणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे . सावंतवाडी शहरासोबतच सह्याद्री पट्ट्यातील गावांमध्येही विजेचा खेळ असाच सुरु असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे .

Advertisement

Advertisement
Tags :

.