For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लाईफलाईन बनतेय डेडलाईन !

06:50 AM Jul 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
लाईफलाईन बनतेय डेडलाईन
Advertisement

मुंबई आणि लोकल हे मुंबईकरांचे अविभाज्य अंग आहे. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल मुंबईकरांसाठी आधार आहे. मात्र याच आधाराला आता ग्रहण लागण्यास सुऊवात झाली आहे. रेल्वे लोकल प्रवासामध्ये खुलेआम हल्ले सुऊ आहेत. यामुळे सकाळी कामावर गेलेली व्यक्ती जोपर्यंत घरी व्यवस्थित येत नाही तोपर्यंत कुंटुबियांच्या जिवात जीव येत नाही. लोकलमधील वाढते हल्ले पाहता मुंबईकरांची लाईफलाईन डेडलाईन बनत चालल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Advertisement

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दररोज 40 लाख प्रवासी लोकल रेल्वेने प्रवास करत असतात. घर ते ऑफीस किंवा इच्छीतस्थळी पोहचण्यासाठी रेल्वे लोकलचाच मुंबईकर किंवा बाहेऊन आलेले प्रवासी आधार घेतात. यामुळेच मुंबईच्या लोकलला मुंबईकरांची लाईफलाईन असे म्हणतात. मात्र गेली अनेक दिवस हिच लाईफलाईन मुंबईकरांसाठी डेडलाईन बनली आहे. अगदी क्षुल्लक कारणास्तव चाकू, सुरा आणि कोयत्याने हल्ले होण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. यामुळे लोकलने प्रवास करणारे काही प्रवासी दहशतीत प्रवास करीत आहेत. अगदी काल परवा अंबरनाथ लोकलमध्ये एका प्रवाशावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. तर गेल्या पंधरा दिवसांत लोकल प्रवासात झालेल्या वेगवेगळ्या घटनेत 8 जण जखमी तर तिघांचा नाहक बळी गेला आहे. यामुळे मुंबईकरांची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल डेडलाईन बनत चालल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

गेल्या चार दिवसांपूर्वी मध्यरात्री अंबरनाथला निघालेल्या लोकलमध्ये बसण्याच्या जागेवऊन किरकोळ वाद झाला. या वादाचे ऊपांतर गंभीर मारामारीत होऊन एका प्रवाशावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. हे वार एवढे वर्मी लागले की प्रवासी गंभीर जखमी झाला. तर मारेकऱ्याने तत्काळ स्थानक जवळ येताच पळ काढला. अचानक झालेल्या हल्याने लोकलमधील सर्व प्रवासी घाबऊन गेले. मात्र रेल्वे पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे हलवत मारेकऱ्याच्या मुसक्या आवळल्या. तर दोन दिवसांपूर्वी लोकल प्रवासात पुन्हा बसण्याच्या जागेवऊन तृतीयपंथी आणि प्रवाशात वाद होत प्रितेश कनोजीया आणि राजु वाघेला हे दोन तृतीयपंथी जखमी झाले. लोकलमध्ये सुऊ असलेले वाद आणि हल्ले रोखण्यासाठी रेल्वे पोलीस आणि केंद्रीय रेल्वे पोलीस बल (आरपीएफ) यांनी धावत्या लोकलमध्ये गस्त घालण्यास सुऊवात केली आहे. मात्र अद्यापही अशा हल्यांना प्रतिबंध घालता आला नाही. या घटनेमुळे लोकलने प्रवास करणारे इतर प्रवासी मात्र दहशतीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कारण हे हल्ले केवळ साधे हल्ले नसून, यामध्ये प्रवाशांचा जीव जात आहे.

Advertisement

मयांक रमेश लोहार (22) हा तऊण अंधेरी (पूर्व), चकाला परिसरातील वेस्टसाईड या कंपनीमध्ये सेल्समनचे काम करीत होता. विरारला राहणाऱ्या मयांकने चर्चगेटहून रात्री 10 वाजून 5 मिनिटांनी सुटलेली नालासोपारा जलद लोकल अंधेरीला पावणेअकराच्या सुमारास पकडली. अशातच पाऊस सुऊ असल्याने, लोकलचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते. परंतु फर्स्ट क्लासच्या मधल्या डब्यात अंधेरीला चढलेल्या रोशन रमेश सुवर्णा या तऊणाने लोकलचा दरवाजा बंद केला नाही. त्याला दरवाजात मनसोक्त भिजायचे होते. मात्र अंगावर पाणी पडत असल्याने आमचे कपडे भिजत आहेत, असे चढ्या आवाजात बोलून काही प्रवाशांनी लोकलचा दरवाजा बंद केला. तेव्हा रोशन आणि सहप्रवाशांमध्ये धक्काबुक्की झाली. चिडलेल्या रोशनने आपल्या बॅगेतील 17 सेंटिमीटर लांब असलेला एक धारदार चाकू बाहेर काढला. मजबूत शरीरयष्टी असलेल्या रोशन सुवर्णाचा आक्रमक पवित्रा पाहून सहप्रवासी घाबरले. त्यातच रोशनने मयांकला पकडले आणि त्याच्या छाती आणि पोटावर चाकूने तीन-चार वार करून त्याला अक्षरश: रक्तबंबाळ केले. मयांक एका क्षणात रेल्वेच्या फुटबोर्डवर रक्ताच्या थारोळ्यात पडला. हा प्रकार मालाड आणि कांदिवलीच्या दरम्यान घडला. बोरिवली स्टेशन आल्यावर रोशन धावत्या ट्रेनमधून उडी मारून पळून गेला. मयांकला जवळच्या शताब्दी ऊग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्याचे निधन झाले. मयांकच्या आई-वडिलांसाठी हा प्रचंड धक्का होता. मीरा रोड (पूर्व) ला राहणारा व मुंबई विमानतळाच्या कार्गो सेक्शनमध्ये कार्गो ऑपरेटर म्हणून काम करणारा रोशन रमेश सुवर्णा आपल्या कर्नाटकातील गावी पळण्याच्या तयारीत असताना पनवेल येथे पकडला गेला.

अशाच प्रकारची घटना 26 जानेवारी 2026 रोजी घडली होती. एन. एम. कॉलेजचे प्राध्यापक आलोक कमार सिंग (33) यांची हत्या केली. बोरिवली लोकलमध्ये मालाड येथे उतरणाऱ्या ओंकार एकनाथ शिंदे या माथेफिऊ तऊणाने धातू पॉलिश करण्याचा अत्यंत टोकदार चिमटा पोटात घुसवून हत्या केली. लोकलमध्ये गर्दी असल्याने चढण्या-उतरण्यावरून वाद झाल्याने ओंकार शिंदेने रागाच्या भरात टोकदार चिमटा आलोक कुमार यांच्या पोटात आरपार घुसवला.  या सर्व पार्श्वभूमीवर रेल्वे पोलिसांनी आता संशयित प्रवाशांच्या बॅगा व सामानाची तपासणी करण्यास सुऊवात केली आहे. 1998 साली जयबाला आशर या 23 वर्षीय महाविद्यालयीन तऊणीवर चर्चगेटकडे निघालेल्या लोकलमध्ये सकाळच्या दरम्यान एका गर्दुल्याने पैशांसाठी हल्ला केला. तिची पर्स पळवून नेण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध करताच तिला डब्याबाहेर ढकलून दिले. त्यावेळी ती धावत्या गाडीतून खाली पडली व तिचे दोन्ही पाय रेल्वेखाली येऊन कापले गेले. तिला कायमस्वऊपी विकलंगत्व आले.

लोकल प्रवासात महिला तर हल्लेखोरांच्या व विकृतांच्या सॉफ्ट टारगेट ठरलेल्या असतात. जुलै 2013 ची घटना महालक्ष्मी-लोअर परेल स्थानकादरम्यान धावत्या लोकलमध्ये एका विकृताने महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र महिलेने केलेल्या आरडा-ओरडीमुळे याच्या मुसक्या आवळण्यात आल्या तर ऑगस्ट 2013 साली अमेरिकन महिला चर्चगेट रेल्वे स्थानकावऊन निघाली असता एका माथेफिऊने लोकलमध्ये कोणीच नाही याचा फायदा उचलत या महिलेवर ब्लेड हल्ला करीत तिची पर्स हिसकाविण्याचा प्रयत्न केला. अशा अनेक घटनांमध्ये महिला व तरूणीवर माथेफिऊंनी हल्ला चढविला आहे. मुंबई रेल्वे पोलिसांची हद्द चर्चगेटपासून पालघर, तर छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून ते कसारापर्यंत आहे. रेल्वे प्रवास करताना रोज सरासरी आठ ते दहा प्रवाशांचा रेल्वे ऊळाखाली येऊन किंवा पडून बळी जातो. त्या मफतांमध्ये एका तरी प्रवासी महिलेचा समावेश असतो. म्हणजे महिला कुठेच सुरक्षित नाहीत. दररोज प्रवास करणाऱ्या कुणालाच आपण वेळेवर व सुरक्षित घरी पोहोचू अशी खात्री आज वाटत नाही. या घटनांना वेळीच आळा नाही बसला तर मुंबईकरांची असलेली लाईफलाईन कायमस्वऊपी डेडलाईन बनेल यात शंका नाही.

अमोल राऊत

Advertisement
Tags :

.