कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

माणसांचे ‘वाचनालय’

06:08 AM Nov 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोणत्याही वाचनालयात (इंग्रजीत ज्याला लायब्ररी म्हणतात) ग्रंथ वाचावयास मिळतात हे आपल्यापैकी बहुतेकांना माहीत आहे. पण या जगात असे एक वाचनालय की जिथे आपल्याला पुस्तके नव्हे, तर माणसेच मिळतात, असे समजल्यास आपला विश्वास बसणे अशक्य आहे. तथापि, ‘नेदरलंडस्’ किंवा हॉलंड या देशात असे वाचनालय अस्तित्वात आहे. येथे या वाचनालयाच्या सदस्याला गप्पा मारण्यासाठी किंवा वेळ घालविण्यासाठी पुस्तके नव्हे, नव्हे तर चक्क माणसे उधारीवर दिली जातात. या स्थानाला उल्लेख ह्यूमन ‘लायब्ररी’ किंवा ‘मानवी वाचनालय’ असाच केला जात आहे. येथे लोक एकमेकांचे जीवनानुभव जाणण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी येत असतात. या वाचनालयात मिळणाऱ्या लोकांना पुस्तकाप्रमाणे आपल्या घरी घेऊन जाण्याचीही सोय उपलब्ध आहे.

Advertisement

Advertisement

या वाचनालयाची कार्यपद्धती विशिष्ट प्रकारची आहे. येथे येणाऱ्या लोकांना एक विषयसूची दिली जाते. त्यातून लोक त्यांना हवा तो विषय निवडतात. या विषयाचे पुस्तक देण्याऐवजी लोकांना हा विषय जाणणारा किंवा हा विषय अनुभवलेला एक मानव दिला जातो. आपण या व्यक्तीशी 20 ते 30 मिनिटे संभाषण करु शकता. आपण निवडलेल्या विषयाची आपल्याला माहीत नसलेली माहिती त्याच्याकडून घेऊ शकता किंवा त्याचे त्या विषयावरील अनुभव ऐकू शकता. त्याला घरी नेऊ शकता. या वाचनालयात विविध विषयात पारंगत असणारे लोक मिळतात. त्यामुळे पुस्तक वाचण्यापेक्षा त्यांच्या तोंडून त्यांचे अनुभव ऐकण्याचा अनोखा अनुभव या वाचनालयाचे सदस्य घेतात. या देशात हे वाचनालय अत्यंत लोकप्रिय आहे.

येथे मिळणारी ‘माणसे’ केवळ चर्चा करण्यासाठी किंवा अनुभवांचे आदान प्रदान करण्यासाठीच असतात. त्यांचा अन्य कोणत्या कारणांसाठी उपयोग केला जाऊ शकत नाही, असा दंडक आहे. अनेकदा एखाद्या विषयावरील पुस्तकात नसलेले अद्भूत अनुभव किंवा प्रसंगही ही माणसे ऐकवू शकतात. निर्जीव पुस्तक वाचण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीचे जिवंत अनुभव समक्ष ऐकणे अधिक स्वारस्यपूर्ण असते, असा या वाचनालयाचे सदस्य असणाऱ्या अनेकांचा अनुभव आहे. पुस्तकांच्या स्थानी माणसे मिळणारे हे वाचनालय जगात एकमेव मानले जात आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article