Ajit Pawar tribute | अजित दादांच्या आठवणीने विधिमंडळ गहिवरले; भर सभागृहात दादांच्या आठवणींनी नेत्यांच्या डोळ्यात अश्रू
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दादांना आदरांजली
मुंबई- राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवार पासुन सुरुवात झाली. दिवंगत उपमुख्यमंत्री आणि लोकप्रिय नेते अजित पवार यांच्या निधनानंतर, विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (२३ फेब्रुवारी २०२६) दोन्ही सभागृहे शोकसागरात बुडाली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत आदरांजली वाहण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी दादांची कार्यशैली, लोकहिताच्या कामाप्रती असलेली त्यांची तळमळ आणि दिलदार स्वभावाच्या आठवणींना उजाळा दिला. विविध नेत्यांनी सांगितलेल्या व्यक्तीगत आठवणींनी सगळे गहिवरले. ‘अजितदादा त्यांच्या कामामुळे कायम महाराष्ट्राच्या स्मरणात राहतील,’ अशी भावना सर्वांनी व्यक्त केली.
अजितदादा सर्वोत्तम मुख्यमंत्री झाले असते - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
देंवेद्र फडणवीस म्हणाले, सर्वाधिक उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला दादा नेहमी म्हणायचे की,मी कधातरी मुख्यमंत्री होईन, मी आज हे म्हणु शकतो की, अजितदादा सर्वोत्तम मुख्यमंत्री झाले असते. एक जो महाराष्ट्राला सर्वोत्तम मुख्यमंत्री मिळाला असता तो आज अजितदादा पवार यांच्या रुपात आज आपल्यात नाही. कधीतरी नियतीने त्यांचे स्वप्न देखील पुर्ण केले असते. विकास प्रकल्पाच्या बाबतीत अजित पवार नेहमी सकारात्मक असायचे. १२ चा कार्यक्रम असला तरी ते ११.५९ ला हजर असायचे. मंत्रालयातील बैठकीला ते अधिकांरांच्या आधी येऊन बसायचे. म्हणुन दादा नसल्याने फाईल पुढे गेली नाही. असे कधी घडले नाही. मंत्रीमंडळात कितीही विषय असले तरीही ते अभ्यास करुन यायचे.
अजितदांदाचे विकासाचे काम पुर्ण करणे हीच त्यांना श्रध्दांजली - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दादा राजकरणात आपण घेतलेले निर्णय अचुक होते. हे जनतेच्या न्यायलयाने सिध्द केले आहे. पण तुमचा हा जगाचा निर्णय घेण्याचा मात्र चुकला आहे. तो मागे घ्या आणि परत या अशा भावुक शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत नेते अजित पवार यांना विधानपरिषेदेत श्रध्दांजली वाहली.
यावेळी माजी मंत्री सुरुपसिंग नाईक, माजी विधानपरिषद सदस्य अशोक मोडक गंगाधर पटणे, निला देसाई या दिवंगतानाही श्रध्दांजली अर्पण केली. अजित दादांच्या आठवणीना उजाळा देताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मी,देवेंद्र, आणि अजित दादा म्हणजे राज्याच्या स्थैयाचा भक्कम ट्र्रॅंगल ऑफ स्टॅबिलीटी होतो. आम्हा तिघे एकत्र आलो म्हणुन महाराष्ट्राची प्रगती आणि भुमती वेगाने सुरु होती. २८ जानेवारीच्या काळ्या दिवसाने आमचा तो आधार हरवुन घेतला आहे. दादा वेळ कधी चुकवत नसत मात्र नियतीने त्या दिवशी मात्र घात केला. टीव्हीवर त्या अपघातची दृ्श्ये पाहीली अन् मनाचा थरकाप उडाला. अशी आठवन त्यांनी सांगितली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना धीर देताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की आभाळ एवढ दुःख असतानाही ताई खंभीर उभ्या आहात. आम्हा दोन्ही भाऊ तुमच्या पाठीशी खंभीरपणे उभे आहोत. दादांनी पाहीलेले विकासाचे स्वप्न हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल. विकास आता थांबणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही. ही दादांची घोषणा आम्ही सत्यात उतरवु असा निर्धार त्यांनी शेवटी व्यक्त केला.
महाराष्ट्राने उमदे नेतृत्व गमावलं - उध्दव ठाकरे
महाराष्ट्राने एक उमदे नेतृत्व गमावलं आहे. महाराष्ट्र ज्यांच्याकडुन अपेक्षा ठेवतो ती माणसं अचानक सोडुन जातात. हे राज्याचे दुदैव आहे. प्रमोद महाराज, गोपीनाथ मुंडे, आर आर पाटील आणि आता अजित दादा, यांच्यासारखी माणसं आता होणार नाही. असे मित्र पुन्हा मिळणे नाही. असे सांगत अजित दांदाच्या आठवणीत उध्दव ठाकरे भाऊक झाल्याचे पाहायला मिळाले. आज पर्यंत सभागृहात दिसणारे अजित दादा आता दिसत नाहीयेत.. ही खंत सगळ्यांचा मनात आहे.
भर सभेत दादांनी आबांना सुनावले होते- जयंत पाटील
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी जुन्या राजकीय आठवणींना उजाळा दिला. जे मनात येईल ते बोलायचे असा दादांचा स्वभाव होता. एका जाहीर सभेत ते आर आर आबांनातंबाखू खाण्याच्या संदर्भात बोलले
होते. दादा इतके बोलले कीआबांना देखील कदाचित वाईटवाटले असेल. मी आबांच्या घरी जाऊन त्यांना म्हटलो की माझ्या व्यासपीठावरून दादा बोलले, मी माफी मागतो. पण, दादा बोलले ते काही चुकीचे नाही, हे देखील मी आबांना बोललो होतो. ज्याचं चुकलंय ते तोंडावर सांगायचं, असा दादांचा स्वभाव होता.
बारामतीत एक ठिणगी अन् महाराष्ट्र होरपळला असता : भास्कर जाधव
शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभेतील गटनेते भास्कर जाधवांनीदेखील अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली. अजित दादांच्या अपघाताबद्दल बोलत ते म्हणाले, रोहित पवार घातपाताचा संशय व्यक्त करत असताना शरद पवार मात्र त्याला अपघात म्हणत होते. पवारांचे हे विधान विसंगत नव्हते.
उलट, त्यावेळची स्फोटक परिस्थिती शांत करण्यासाठी आणि राज्याला मोठ्या संकटापासून वाचवण्यासाठी शरद पवारांनी केलेले ते अत्यंत योग्य विधान होते. त्यावेळी बारामतीत एक ठिणगी पडली असती तर अख्खा महाराष्ट्र होरपळून निघाला असता, असं भास्कर जाधव म्हणाले.
काकांना श्रध्दांजली वाहताना पुतण्या भावूक
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या शोक प्रस्तावाला पाठिंबा देत भाषण केले. भाषणाचा शेवट करताना रोहित पवारांना अश्रू अनावर झाले.