For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आठवड्याचे शेवटचे सत्रही घसरणीसह बंद

06:07 AM Feb 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
आठवड्याचे शेवटचे सत्रही घसरणीसह बंद
Advertisement

जागतिक संमिश्र स्थितीचा पुन्हा गुंतवणूकदारांना फटका

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

चालू आठवड्याचा शेवटच्या दिवशी भारतीय बाजार घसरणीसह बंद झाला. यामध्ये सेन्सेक्स 425 अंकांनी घसरला, तर निफ्टी 22,796 वर बंद झाला.  जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे शुक्रवारी बाजाराची सुरुवात नकारात्मक राहिल्याचे दिसून आले.  दिग्गज कंपन्यांच्या मदतीने शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 424.90 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 75,311.06 वर बंद झाला. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 117.25 अंकांच्या घसरणीसह  निर्देशांक 22,795.90 वर बंद झाला.

Advertisement

सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी फक्त 9 समभाग तेजीसह बंद झाले. सर्वाधिक तेजीत असणाऱ्या समभागांमध्ये टाटा स्टील, एल अँड टी, एचसीएल टेक, एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक, एनटीपीसी, टीसीएस, नेस्ले इंडिया आणि बजाज फिनसर्व्ह यांचा समावेश होता. त्याच वेळी, सर्वाधिक तोटे झालेल्या समभागांमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, अदानी पोर्ट्स, टाटा मोटर्स, सन फार्मा, पॉवरग्रिड, झोमॅटो, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, अल्ट्राटेक सिमेंट आणि कोटक महिंद्रा बँक यांचा समावेश होता. निफ्टी 50 मधील 50 पैकी 35 समभाग घसरणीसह बंद झाले. ज्यात महिंद्रा अँड महिंद्रा, अदानी पोर्ट्स, बीपीसीएल, टाटा मोटर्स आणि विप्रो यांचा समावेश आहे. यामध्ये 6.20 टक्के इतकी घसरण झाली. प्रमुख निर्देशांकांप्रमाणेच व्यापक बाजारांनीही कमी कामगिरी केली. दुसरीकडे, पीएसयू बँकांनी नफा मिळवला, पीएनबी आणि आयडीबीआय बँक सुमारे 2 टक्क्यांनी घसरले.

चालू आठवडाही घसरणीसह बंद झाला आहे. यामुळे आगामी आठवड्यात बाजाराची काय वाटचाल कशी राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेत नियोजन करावे लागणार असल्याचे शेअर बाजार अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.

या कारणास्तव बाजार कोसळला

-मुख्य कंपन्यांच्या समभागांमध्ये घसरणीचा प्रवास

-आशियातील बाजारात कोरियाचा कोस्पी तेजीत तर हाँगकाँगचा बाजार घसरणीत राहिला.

-20 फेब्रुवारी रोजी 3,311.55 कोटींच्या समभागांची विक्री

-तर देशातील बाजारात 3,907.64 कोटींच्या समभागांची विक्री करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.