For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जगातील सर्वात मोठे बीज

06:21 AM Apr 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
जगातील सर्वात मोठे बीज
Advertisement

40 किलो वजन, अर्धा मीटर लांब

Advertisement

जगातील सर्वात मोठे बीज किती मोठे असते हे तुम्हाला ठाऊक आहे का? जगातील सर्वात मोठे बीज एका खास आकाराचे असते, याला दुर्लभ बीज मानले जाते. या बीजाचे वजन सुमारे 40 किलोग्रॅम असते आणि त्याची लांबी अर्धा मीटर इतकी असते. हे बीज कोको डी मेर या वृक्षाचे असते. हे एकप्रकारचे ताडाचे वृक्ष असून याचे शास्त्राrय नाव लोडोईसीई मालडिविया आहे. याच्या बीजाला जगातील सर्वात मोठे बीज मानले जाते. हे एक दुर्लभ आणि अनोखे बीज असून ते निसर्गाच्या चमत्कारांपैकी एक आहे.

हे ताड (पाम) परिवाराचा असून मुख्यत्वे सेशेल्स बेटसमुहाच्या प्रालिन आणि क्यूरियस बेटांवर आढळून येते. तसेच कोको डी मेर या वृक्षाचा इतिहास देखील कमी रंजक नाही.

Advertisement

कहाणी अत्यंत रंजक

हे बीज सेशेल्समध्येच नैसर्गिक स्वरुपात आढळते. 16 व्या आणि 17 व्या शतकात युरोपीय खलाशांनी या बीजाला हिंदी महासागरात तरंगताना पाहिले, तेव्हा त्यांना तो ‘सागरी नारळ’ वाटला. त्यावेळी हे कुठून आले हे कुणालाच माहित नव्हते. याचे नाव कोको डी मेर फ्रेंच भाषेतून आले असून याचा अर्थ समुद्राचा नारळ असा होतो. नंतर 18 व्या शतकात सेशेल्सच्या शोधासोबत या वृक्षाची ओळख पटली. हा शोध निसर्गाच्या रहस्यांना उघड करणारे एक मोठे पाऊल होते.

बीजाचा आकार

कोको डी मेरचे बीज स्वत:च्या विशाल आकारासाठी प्रसिद्ध आहे. हे सर्वसाधारणपणे 40-50 सेंटीमीटर लांब आणि 30 सेंटीमीटर रुंद असते. याच sवजन 15-30 किलोपर्यंत असू शकते. काही असाधारण प्रकरणांमध्ये याचे वजन 40 किलोग्रॅमपर्यंत नोंदले गेले आहे. याचा आकार मोठा असल्याने एका व्यक्तीला ते उचलणे अवघड ठरते. हा आकार त्याला अन्य सर्व बीजांपासून वेगळा करतो.

रचना अनोखी

या बीजाची रचना अनोखी आहे. हा दोन हिस्स्यांमध्ये विभागलेला वाटतो, ज्याला ‘द्विलंबी’ संरचना म्हटले जाते. याचे बाहेरील आवरण मोठे, कठोर असते, जे याला पर्यावरणीय धोक्यांपासून वाचविते, याला ऐतिहासि स्वरुपात जादुई आणि औषधीय गुणांशी जोडण्यात आले आहे. आतील हिस्सा पांढऱ्या रंगाचा असतो, जो खाण्यायोग्य असतो. परंतु हे अत्यंत स्वादिष्ट मानले जात नाही, याची संरचना याला दीर्घकाळापर्यंत सुरक्षित ठेवण्यास मद करते.

उंच वृक्ष, पानांचा आकार मोठा

कोको डी मेरचा वृक्षही प्रभावशाली आहे. हा 25-34 मीटरपर्यंत उंच असू शकतो. याची पानं 7-10 मीटर लांब आणि 4-5 मीटर रुंद असतात. ही एक द्विलिंगी प्रजाती आहे, म्हणजेच नर आणि मादी वृक्ष वेगवेगळे असतात, मादी वृक्षच बीज निर्माण करतात आणि एका बीजला पूर्णपणे विकसित होण्यास 6-7 वर्षे लागतात. हा वृक्ष उष्णकटिबंधीय हवामानात बहरतो. मातीत ओलावा आणि हवेत आर्द्रता अधिक असणे याकरता आदर्शवत आहे. सेशेल्सचे अनोखे हवामान या वृक्षासाठी आदर्श मानले जाते.

बीज निर्मिती प्रक्रिया

कोको डी मेरचे प्रजनन मंद आणि जटिल आहे. नर वृक्ष लांब फुलांचे गुच्छ निर्माण करतो, जो परागीकरणासाठी हवा आणि किड्यांवर निर्भर असतो. मादी वृक्षावर फळ निर्माण होण्यास वर्षे लागतात, एकदा पिकल्यावर फळ जमिनीवर पडते आणि अंकुरण सुरू होते. अंकुरणाची प्रक्रिया देखील मंद असते, याकरता आर्द्रता, उष्णता आणि पोषक घटकांची आवश्यकता असते. एका बीजातून नवा वृक्ष निर्माण होण्यास 20-40 वर्षांपर्यंत लागू शकतात, जे याच्या दुर्लभतेचे कारण देखील आहे.

पूर्वी मानले जायचे मूल्यवान

ऐतिहासिक स्वरुपात कोको डी मेरला जादुई आणि औषधीय गुणांनी युक्त मानले जायचे. याला प्राचीन काळात मसाले आणि सोन्यांपेक्षा अधिक मूल्यवान मानले गेल होते. परंतु आता हे सेशेल्सची संस्कृती आणि पर्यटनाचे प्रतीक आहे. याच्या विक्रीवर कठोर नियंत्रण असून एका बीजाची किंमत हजारो डॉलर्सपर्यंत असू शकते. ही संरक्षित प्रजाती असून याला युनेस्को जागतिक वारसा यादीत संरक्षित करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.