भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर
या पक्ष्यांसाठी आहे अत्यंत खास
आमच्या पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण अधिक आहे, परंतु पिण्याच्या पाण्याचे प्रमाण केवळ 3 टक्केच आहे. यातील 0.6 टक्के पाणी नद्या, तलाव आणि सरोवरांमध्ये आहे. अनेक ठिकाणी पाणी तर आहे, परंतु ते पिण्याजोगे नाही. भारतात सर्वात खारट पाण्याचे सरोवर आढळून येते. याचे पाणी समुद्रापेक्षाही खारे आहे.
पृथ्वीवर पिण्यासाठी स्वच्छ अन् गोड पाण्याचा बहुतांश हिस्सा ग्लेशियर आणि ध्रूवीय बर्फाच्या स्वरुपात गोठलेले आहे. तर 0.6 टक्के पाणीच नद्या, सरोवर आणि तलावांमध्ये आहे. पृथ्वीवरील सुमारे 97 टक्के पाणी सॉल्ट वॉटरच्या स्वरुपात असून ते पिता येत नाही. भारतात समुद्रापेक्षाही खारट पाणी राजस्थानतील सांभर सरोवरात आढळून येते. हे सरोवर अजमेर, जयपूर आणि नागौर जिल्ह्यामध्ये आहे. या सरोवराचे पाणी इतके खारट आहे की याद्वारे मीठ तयार केले जाते. याचबरोबर बाडमेर येथील पचपदरा सरोवर आणि महाराष्ट्रातील लोणार सरोवरही खाऱ्या पाण्याचा आहे.
सांभर सरोवरात सोडियम क्लोराइडचे प्रमाण अधिक आहे, याचमुळे याद्वारे एकूण मिठाच्या जवळपास 10 टक्क्यांपर्यंत मीठ तयार होते. या सरोवराचे सॉल्ट कंसंट्रेशन सागरी पाण्यापेक्षाही अधिक असू शकते. यालाच हायपरसॅलिन म्हटले जाते. याचा एक थेंब देखील खारटपणाची जाणीव करून देतो. हे सरोवर प्रवासी पक्षी म्हणजेच फ्लेमिंगो बर्ड्ससाठी अत्यंत खास आहे. या सरोवरातून दरवर्षी लाखो टन मीठ मिळविले जाते.