बोगद्यात अडकलेल्या मजुरांची आज होणार सुटका? नातेवाईकांना बॅग तयार ठेवण्याचे निर्देश
उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.सध्या रेस्क्यू टीम बोगद्याच्या वरून रैट होल माइनिंग आणि बोगद्याच्या वरून ड्रिलिंग करत आहेत. लवकरच कामगारांना बाहेर काढले जाईल, अशी आशा आहे. बचाव पथकाने कामगारांच्या नातेवाईकांना बॅग तयार ठेवण्यास सांगितले आहे.यामुळे मजुरांची आज सुटका होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार अडकलेल्या 41 कामगारांच्या नातेवाईकांना तयार राहण्यास सांगण्यात आले आहे. कामगारांचे कपडे आणि बॅग तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे. कामगारांना बाहेर काढल्यानंतर चिन्यालिसौर रुग्णालयात नेण्यात येईल.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले आहेत की, 52 मीटर पाईप टाकण्यात आले आहेत. 57 मीटर अंतरापर्यंत पाईप टाकायचे आहेत. हा ढिगारा 10 मीटरपर्यंत खणावा लागेल असे त्यांनी सांगितले. 4-5 मीटर खोदकाम झाले आहे. पाईपही टाकण्यात आले आहेत. तज्ज्ञ मजुरांची टीम रॅट-होल मायनिंग तंत्राचा वापर करून हाताने मलबा हटवत आहेत. त्यानंतर त्यात 800 मिमी व्यासाचे पाइप टाकण्यात येत आहेत. रैट होल माइनर्सनी 4-5 मीटर खोदले आहे. आता केवळ 7-8 मीटर खोदकाम शिल्लक असल्याचे मानले जात आहे. उत्खनन पूर्ण झाल्यानंतर त्यात 800 मिमी व्यासाचा पाइप टाकण्यात येणार आहे.
तर मॅन्युअल हॉरिझॉन्टल ड्रिलिंगसाठी दोन टीम तैनात करण्यात आल्या आहेत. एका टीममध्ये 5 तज्ज्ञ आहेत, तर दुसऱ्या टीममध्ये 7 आहेत. या 12 सदस्यांची अनेक टीममध्ये विभागणी करण्यात आली आहे. हे पथक उर्वरित मलबा बाहेर काढतील. यानंतर 800 मिमी व्यासाचा पाइप टाकला जाईल. याच्या मदतीने एनडीआरएफची टीम कामगारांना बाहेर काढणार आहे.